ETV Bharat / state

स्वतःला कार्यसम्राट म्हणणाऱ्या आमदाराला हद्दपार करा - माजी आमदार पंडित

author img

By

Published : Oct 9, 2019, 9:44 PM IST

कमिशन घेवून गुत्तेदार पोसणाऱ्या आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या आमदाराला हद्दपार करा, अशी खोचक टीका माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केली आहे.

स्वतःला कार्यसम्राट म्हणणाऱ्या आमदाराला हद्दपार करा - माजी आमदार अमरसिंह पंडित

बीड - कमिशन घेवून गुत्तेदार पोसणाऱ्या आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या आमदाराला हद्दपार करा, अशी खोचक टीका माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केली आहे. ते गेवराई विधानसभा मतदार संघात रंजेगाव येथे त्यांचे लहान भाऊ विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. गेवराई विधानसभेत तिरंगी लढतीचे चित्र असून राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित, भाजपकडून अ‌ॅड. लक्ष्मण पवार तर अपक्ष म्हणून शिवसेनेचे बंडखोर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, आम्ही कायम शेतकऱ्याच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत. शेतकऱ्याचा ऊसाचा प्रश्न असो की, गावातील रस्त्याचा रस्त्यांची कामे असो, कायम जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही धावून आलेलो आहोत. यापुढच्या काळातही जनसामान्यांची सेवा करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. गेवराई विधानसभा मतदार संघातील जनतेला मी विनंती करतो की, विजयसिंह पंडित यांना साथ द्या, असे आवाहन अमरसिंह पंडित यांनी केले.

हेही वाचा - 'आईचा शब्द न पाळणारे मतदारांशी काय प्रामाणिक राहणार?'

यावेळी गेवराई विधानसभा मतदार संघातील रंजेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गोरख आबुज, माजी उपसरपंच सुखदेव आबुज, यांच्यासह शेकडो भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करून विजयसिंह पंडित यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. घड्याळाचे चिन्ह पिंपळनेर सर्कलमधील घराघरामध्ये पोहोचवून विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्य मिळवून द्या असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा - जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई, आशिर्वाद देण्याचे संदीप क्षीरसागरांचे आवाहन

Intro:गेवराई विधानसभा: स्वतःला कार्यसम्राट म्हणून पाठ थोपटून घेणाऱ्या आमदाराला हाद्दपार करा; अमरसिंह पंडित यांची खोचक टीका

बीड- कमिशन घेवून गुत्तेदार पोसणार्या व स्वतःला कार्यसम्राट म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या गेवराईच्या आमदाराला हद्दपार करा, अशी खोचक टीका माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केली. ते गेवराई विधानसभा मतदार संघात रंजेगाव येथे त्यांचे लहान भाऊ विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. गेवराई विधानसभेत तिरंगी लढतीचे चित्र आहे. यामध्ये राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित, भाजपकडून एडवोकेट लक्ष्मण पवार तर अपक्ष म्हणून शिवसेनेचे बंडखोर माजी राज्यमंत्री बदामराव पंडित निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

पुढे बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, आम्ही कायम शेतकऱ्याच्या विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत. शेतकऱ्याचा ऊसाचा प्रश्न असो की, गावातील रस्त्याचा रस्त्याचे काम असो, कायम जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही धावून आलेलो आहोत. यापुढच्या काळातही जनसामान्यांची सेवा करायचा आम्ही समर्थ आहोत. गेवराई विधानसभा मतदार संघातील जनतेला मी विनंती करतो की, विजयसिंह पंडित यांना साथ द्या, असे अवाहन माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केले.

यावेळी गेवराई विधानसभा मतदार संघातील रंजेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य गोरख आबुज, माजी उपसरपंच सुखदेव आबुज, यांच्यासह शेकडो भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे स्वागत करून विजयसिंह पंडित यांच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. घड्याळाचे चिन्ह पिंपळनेर सर्कलमधील घराघरामध्ये पोहोचवून विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्य मिळवून द्या असेही ते यावेळी म्हणाले.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.