ETV Bharat / state

उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी घ्या, अडचण आल्यास थेट संपर्क साधा - अमरसिंह पंडित - beed news today

पंडित यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून, उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली. शेतातील खरीपाचे पीक वाया गेल्यानंतर पाण्याचे नियोजन आपण करणार का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शेतातील पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असून आत्ता पाणी मिळाले नाही, तर नंतर पाण्याची आवश्यकताच भासणार नाही. असेही माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी अधिकाऱ्यांना समजावून सांगितले.

माजी आमदार अमरसिंह पंडित
author img

By

Published : Aug 19, 2019, 11:31 PM IST

बीड - जायकवाडी जलाशयात ९० टक्केहून अधिक पाणीसाठा आहे. सध्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरु असून कालव्यातून शेतीसाठी पाणी वापरास शासनाने प्रतिबंध केला आहे. याबाबत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी मुख्य अभियंता आणि इतरांशी चर्चा करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी त्यास तत्वतः मान्यता दिली असल्यामुळे शेतकऱ्यांनी उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याचा वापर करावा, असे आवाहन अमरसिंह पंडित यांनी केले असून, याबाबत कोणतीही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी थेट आपल्याशी संपर्क करण्याचे आवाहनही पंडित यांनी केले आहे.

उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी घ्या, अडचण आल्यास थेट संपर्क करण्याचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे आवाहन

श्रावण सोमवारनिमित्त मौजे मालेगाव येथील व्यसनमुक्ती महादेवाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी भेट दिली होती. त्यावेळी, या भागातील शेतकऱ्यांनी उजव्या कालव्यातून पाणी उचलण्यास अधिकाऱ्यांकडून होत असलेला मज्जाव आणि थेट पाईपलाईन फोडण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याची तक्रार माजी पंडित यांच्याकडे केली.

यावेळी पंडित यांनी तत्काळ जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून, उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली. शेतातील खरीपाचे पीक वाया गेल्यानंतर पाण्याचे नियोजन आपण करणार का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शेतातील पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असून आत्ता पाणी मिळाले नाही, तर नंतर पाण्याची आवश्यकताच भासणार नाही, असेही अमरसिंह पंडित यांनी अधिकाऱ्यांना समजावून सांगितले.

जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी कृषीपंपाद्वारे पाणी उचलण्याची मागणी तत्वतः मान्य केली असून, लवकरच चाऱ्या आणि वितरिकांमधून खरीपासाठीचे एक आवर्तन देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. तसेच, लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन अधिकारी स्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती अमरसिंह पंडित यांनी दिली.

सध्या शेतकऱ्यांनी तत्काळ कृषीपंपाच्या सहाय्याने कालव्यातून पाणी उचलावे, मात्र चाऱ्या आणि वितरिकांची कोणतीही तोडफोड अथवा कालव्याची हानी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कृषीपंपाद्वारे पाणी उचलण्यास कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मज्जाव केला अथवा अडथळा निर्माण केल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन माजी पंडित यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी या निर्णयामुळे पाणी उपलब्ध झाले असल्यामुळे या भागातील शेतकर्यांनी अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.

Intro:उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी घ्या;
अडचण आल्यास थेट संपर्क करण्याचे केले अमरसिंह पंडित यांनी आवाहन

बीड- जायकवाडी जलाशयात ९० टक्केहून अधिकचा पाणीसाठा आहे, सध्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी पाण्याचा विसर्ग सुरु असून कालव्यातून शेतीसाठी पाणी वापरास शासनाने प्रतिबंध केला आहे. या बाबत माजी आ.अमरसिंह पंडित यांनी मुख्य अभियंता आणि इतरांशी चर्चा करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली. अधिकार्यांनी त्यास तत्वतः मान्यता दिली असल्यामुळे शेतकर्यांनी उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याचा वापर करावा असे आवाहन अमरसिंह पंडित यांनी केले असून या बाबत कोणतीही अडचण असल्यास शेतकर्यांनी थेट आपल्याशी संपर्क करण्याचे आवाहनही माजी आ. अमरसिंह पंडित यांनी केले आहे.

श्रावणी सोमवारनिमित्त मौजे मालेगाव येथील व्यसनमुक्ती महादेवाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माजी आ.अमरसिंह पंडित यांनी भेट दिली होती. त्यावेळी या भागातील शेतकर्यांनी उजव्या कालव्यातून पाणी उचलण्यास अधिकार्यांकडून होत असलेला मज्जाव आणि थेट पाईपलाईन फोडण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याची तक्रार माजी आ.अमरसिंह पंडित यांच्याकडे केली. यावेळी पंडित यांनी तात्काळ जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांच्यासह संबंधित अधिकार्यांना संपर्क करून उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्याची मागणी केली. शेतातील खरीपाचे पिक वाया गेल्यानंतर पाण्याचे नियोजन आपण करणार का ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शेतातील पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असून आत्ता पाणी मिळाले नाही तर नंतर पाण्याची आवश्यकताच भासणार नाही असेही अमरसिंह पंडित यांनी अधिकार्यांना समजावून सांगितले.
         
जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी शेतकर्यांना कृषीपंपाद्वारे पाणी उचलण्याची तत्वतः मागणी मान्य केली असून लवकरच चार्या आणि वितरीकांमधून खरीपासाठीचे एक आवर्तन देण्याचेही त्यांनी मान्य केले असून लवकरच पाणी सोडण्याचे नियोजन अधिकारी स्तरावर करण्यात येणार असल्याची माहिती अमरसिंह पंडित यांनी दिली. सध्या शेतकर्यांनी तात्काळ कृषीपंपाच्या सहाय्याने कालव्यातून पाणी उचलावे मात्र चार्या आणि वितरीकांची कोणतीही तोडफोड अथवा कालव्याची हानी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कृषीपंपाद्वारे पाणी उचलण्यास कोणत्याही कर्मचार्यांनी मज्जाव केला अथवा अडथळा निर्माण केल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन माजी आ.अमरसिंह पंडित यांनी शेतकर्यांना केले आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्यांना शेतीसाठी या निर्णयामुळे पाणी उपलब्ध झाले असल्यामुळे या भागातील शेतकर्यांनी अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.