ETV Bharat / state

बीड जिल्ह्याला दिवसाला किती लागतोय ऑक्सिजन? कशी वाढली मागणी?

बीड जिल्ह्यात कोरोनाचा पीक पिरेड सुरू झाला, तेव्हापासून दिवसाकाठी सातशे ते आठशे ऑक्सिजन सिलिंडर लागतात. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई व बीड या दोन ठिकाणी ऑक्सिजन केंद्रे आहेत. दिवसाला जिल्ह्यात 700 ते 800 ऑक्सिजन सिलिंडरची गरज आहे.

etv bharat special report on oxygen cylinder supply
बीड जिल्ह्याला दिवसाला किती लागतोय ऑक्सिजन
author img

By

Published : Sep 19, 2020, 3:33 PM IST

Updated : Sep 19, 2020, 4:08 PM IST

बीड - जिल्ह्यात आज घडीला 8 हजाराच्या घरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. दररोज 600 ते 700 रुग्ण ऑक्सिजन बेडवरती आहेत. यासाठी दिवसाला 700 ते 800 ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांच्या तुलनेत ऑक्सिजन बेडवर असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना ऑक्सिजनची मात्रा जास्त द्यावी लागते. अगदी एका रुग्णाला 80 लिटर प्रति मिनिट इतका ऑक्सिजन द्यावा लागत असल्याची माहिती डॉ. यशवंतराजे भोसले यांनी दिली.

बीड जिल्ह्याला दिवसाला किती लागतोय ऑक्सिजन? कशी वाढली मागणी?

बीड जिल्ह्यात दोन ठिकाणावरून ऑक्सिजन पुरवठा केला जातो. यामध्ये अंबाजोगाई व बीड या दोन ठिकाणी ऑक्सिजन केंद्र उभारलेले आहेत. येत्या पंधरा दिवसात बीड जिल्ह्यात अजून चार शासकीय ऑक्सिजन केंद्रे उभारणार असल्याचे लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक एकनाथ माले यांनी सांगितले.

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी बीड जिल्ह्यात दिवसाला केवळ शंभर सिलिंडर मागणी असायची. मात्र, जेव्हापासून बीड जिल्ह्यात कोरोनाचा पीक पिरेड सुरू झाला, तेव्हापासून दिवसाकाठी सातशे ते आठशे ऑक्सिजन सिलिंडर लागतात. एकंदरीत बीड जिल्ह्यात दिवसाकाठी सहाशे ते सातशे रुग्ण ऑक्सिजन बेडवरती उपचारासाठी असतात. त्या रुग्णांना 80 लिटर प्रति मिनिट एवढा ऑक्सिजन पुरवावा लागतो. या सगळ्या परिस्थितीत बीड जिल्ह्यात अंबाजोगाई व बीड या दोन ठिकाणी ऑक्सिजन केंद्रे आहेत. या दोन्ही ठिकाणावरून बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यामध्ये ऑक्सिजन सिलिंडर पुरवले जात आहेत.

Last Updated : Sep 19, 2020, 4:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.