ETV Bharat / state

नैराश्येतून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; एका विषयात झाला होता नापास - शहर पोलीस ठाणे

गणेश सध्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत तो एका विषयात नापास झाला.

मृत गणेश कराड
author img

By

Published : Jul 2, 2019, 7:29 PM IST

बीड - येथील एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाजोगाई शहरात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. परीक्षेत एका विषयात नापास झाल्याने आलेल्या नैराश्येतून या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

Dead Ganesh karad
मृत गणेश कराड

गणेश तुकाराम कराड (वय २४, रा. वांगदरी, ता. परळी) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे सर्व कुटुंबीय अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात वास्तव्यास आहेत. गणेश सध्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत तो एका विषयात नापास झाला. ही बाब गणेशच्या मनाला लागल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता.

सोमवारी दुपारी ३ ते ६ वाजताच्या दरम्यान त्याचे आई-वडील गावाकडे शेतात गेले होते. यावेळी घरात कोणीच नसताना गणेशने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी त्याचे आई-वडील परतल्यानंतर ही घटना उघड झाली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ. कुलकर्णी करत आहेत. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:बीडमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; एका विषयात नापास झाल्याने आले होते नैराश्य

बीड- अभियांत्रिकीच्या परीक्षेत एका विषयात नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात सोमवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.

गणेश तुकाराम कराड (वय २४, रा. वांगदरी, ता. परळी) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे सर्व कुटुंबीय अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात वास्तव्यास आहेत. गणेश सध्या पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेत तो एका विषयात नापास झाला. ही बाब गणेशच्या मनाला लागल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता. सोमवारी दुपारी ३ ते ६ वाजताच्या दरम्यान त्याचे आई-वडील गावाकडे शेतात गेले होते. यावेळी घरात कोणीच नसताना गणेशने छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी त्याचे आई-वडील गाव्कडून परतल्यानंतर ही घटना उघड झाली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे.कॉ. कुलकर्णी करत आहेत. उमद्या मनाच्या गणेशच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.