ETV Bharat / state

बीड स्वस्त धान्य अपहार प्रकरण : 3 जणांवर गुन्हा दाखल - अपहार

एकूण स्वस्त धान्य घोटाळा जवळपास ५५ लाख रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अरविंद झेंड, संजय हंगे व नितीन जाधव या तिघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलीस निरीक्षण बल्लाळ
author img

By

Published : Mar 14, 2019, 12:37 PM IST

बीड- पुरवठा विभागा अंतर्गत असलेल्या स्वस्त धान्यात अपहार केल्याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकच परमिट अनेक वेळा खतवून स्वस्त धान्य काळ्याबाजारात विकल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. दोन महिन्यापूर्वी ५ लाखांची लाच घेतल्यावरुन बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांना निलंबित करण्यात आले होते.

पोलीस निरीक्षण बल्लाळ व्हीडिओ

बीड जिल्हा पुरवठा अधिकारी हरिचंद्र गवळी यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की समितीमार्फत गोदाम तपासणीमध्ये १४,६८७ क्विंटल धान्याची गोदामांमध्ये तफावत आहे. यावरून तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी आदेशित केले होते. या प्रकरणातील अहवाल सोयीचा देण्यावरून ५ लाख रुपयांची लाच घेताना स्वतः बी . एम. कांबळेच पकडले गेले. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले.

एकूण स्वस्त धान्य घोटाळा जवळपास ५५ लाख रुपयांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अरविंद झेंड, संजय हंगे व नितीन जाधव या तिघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

काय आहे घोटाळा
बीड गोदामातून एका क्रमांकाच्या परमिटवर दोन वेळा धान्य उचलले गेले आहे. या स्वस्त धान्य तफावत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली. या समितीने संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर केला. यात सांगण्यात आले, की तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अतुल अरविंद सेंड व संजय नारायण हांगे यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत शासकीय धान्य गोदाम कृषी उत्पन्न बाजार समितीतील १५५८.९९ क्विंटल धान्य ( किंमत ३८ लाख ७३ हजार) तसेच, संजय हांगे यांनी साखरेच्या मूळ परमिटची एकापेक्षा अधिक वेळा नोंद करुन ५७३४४ क्विंटल साखरेचा (किंमत १४ लाख ५७ हजार ७७७.२१)अपहार केला आहे.

तसेच, याच कालावधीत गोदाम व्यवस्थापक नितीन तुकाराम जाधव यांनी शासकीय गोदामातील ११२.५ क्विंटल धान्याचा (किंमत २३ लाख ८३ हजार ७४रुपये) परमिटचा एकापेक्षा अधिक वेळा वापर करून अपहार केला आहे. या प्रकरणाची चौकशी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ चौकशी करत आहेत.

Intro:बीडमध्ये स्वस्त धान्य अपहार प्रकरणी तिघाजना वर गुन्हा दाखल आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता

बीड- बीड येथील पुरवठा विभागा अंतर्गत बीड तहसील मध्ये स्वस्त धान्य अपहार घोटाळा केल्याप्रकरणी तिघाजनावर बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. एकच परमिट अनेक वेळा खतवून स्वस्त धान्य काळ्याबाजारात विकले. याच प्रकरणात दोन महिन्यापूर्वी पाच लाखाची लाच घेतल्यावरुन अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे निलंबित झाले होते. बुधवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Body:बीड जिल्हा पुरवठा अधिकारी हरिचंद्र गवळी यांच्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, समितीमार्फत गोदाम तपासणीमध्ये 14687 क्विंटल धान्याची गोदामांमध्ये तफावत आहे. यावरून तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी बीड यांनी आदेशित केले होते. या प्रकरणातील अहवाल सोयीचा देण्यावरून पाच लाख रुपयांची लाच घेताना बी . एम. कांबळे यांना निलंबित केले होते. एकूण स्वस्त धान्य घोटाळा जवळपास 55 लाख रुपयाचा आहे. याप्रकरणी तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अरविंद झेंड, संजय हंगे व नितीन जाधव या तिघा विरोधात धान्य ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Conclusion:असा झाला होता घोटाळा-
बीड गोदामा तुं एका क्रमांकाच्या परमिटवर दोन वेळा धान्य उचलले गेलेले आहे. या स्वस्त धान्य तफावत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली. या समितीने संपूर्ण चौकशी करून पुढील प्रमाणे दिला आहे. तत्कालीन गोदाम व्यवस्थापक अतुल अरविंद सेंड व संजय नारायण हांगे यांनी 2014 ते 2016 या कालावधीत शासकीय धान्य गोदाम कृषी उत्पन्न बाजार समिती बीड येथील 1558.99 क्विंटल तर किंमत 38 लाख 73 हजार तसेच संजय हांगे यांनी याच कालावधीत साखरेचा मूळ परमिटची एकापेक्षा अधिक वेळा नोंद करून 573 44 साखरेची किंमत 14 लाख 57 हजार 777 पॉईंट 21 रुपयांचा अपहार केला आहे. तसेच याच कालावधीत गोदाम व्यवस्थापक नितीन तुकाराम जाधव यांनी शासकीय गोदामात गोदामातील 112.5 क्विंटल किंमत 23 लाख 83 हजार 74 रुपयाचा मूळ धान्य परमिटचा एकापेक्षा अधिक वेळा वापर करून अपहार केला आहे. या प्रकरणाची चौकशी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ चौकशी करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना झाले असल्याची माहिती बल्लाळ यांनी यावेळी दिली. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.