ETV Bharat / state

एक महिन्यापासून बीड शहर तहानलेले; दुष्काळ निवारणासाठी पालिका ठरतेय अपयशी

बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव प्रकल्पात ७२ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. बीड शहराला एकावेळी पाणी पुरवठा करण्यासाठी २५ ते २७ एम. एल. डी. पाणी लागते. एवढे पाणी लागत असले तरी पुढील एक महिना बीड शहराला सुरळीत पाणी पुरवठा करता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे असताना केवळ बीड पालिकेतील नियोजनाच्या अभावामुळे बीडकरांना एक महिन्यापासून पिण्याचे पाणी दिलेले नाही.

सर्वजनिक ठिकाणी पाण्याची गर्दी केलेले स्थानिक
author img

By

Published : Jun 4, 2019, 12:07 PM IST

Updated : Jun 4, 2019, 2:30 PM IST

बीड - शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करण्यासाठी बीड पालिका अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. चक्क एक महिन्यापासून अर्ध्या बीड शहराला बीड पालिकेने पाणीपुरवठा केला नसल्याचे समोर आले आहे. बीड पालिका प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्याने बीड शहराला पाणीपुरवठा वेळेत होऊ शकत नाही. माजलगाव प्रकल्पात आज घडीला ७२ दलघमी पेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असतानाही पाणी मिळत नसल्याने बीडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एक महिन्यापासून बीड शहर तहानलेले; बघा स्पेशल रिपोर्ट

बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव प्रकल्पात ७२ दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. बीड शहराला एकावेळी पाणी पुरवठा करण्यासाठी २५ ते २७ एम. एल. डी. पाणी लागते. एवढे पाणी लागत असले तरी पुढील एक महिना बीड शहराला सुरळीत पाणी पुरवठा करता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे असताना केवळ बीड पालिकेतील नियोजनाच्या अभावामुळे बीडकरांना एक महिन्यापासून पिण्याचे पाणी दिलेले नाही. ही स्थिती वारंवार निर्माण होत असल्याने बीडकरांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेला पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने देखील पाणीपुरवठ्याचा पूर्णतः खेळखंडोबा झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

१ हजार लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात ५०० रुपये -

बीड शहरात पालिकेच्या नियोजनाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना एक हजार लिटर पाण्यासाठी पाचशे रुपये मोजावे लागत आहेत. ज्यांच्याकडे पाणी विकत घेण्याची क्षमता आहे तेच पाणी विकत घेत आहेत. इतरांना मात्र सार्वजनिक ठिकाणच्या नळावर तास अन् तास हंडाभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासन तसेच बीड नगरपालिका बीडकरांना वेळेवर पाणी देण्यासाठी सक्षम नसल्याचे चित्र आहे.
गेल्या एक महिन्यापासून बीड शहर तहानलेले आहे. यामध्ये स्वराज्य नगर, भक्ती कंस्ट्रक्शन, जिजाऊ कॉलनी, एकनाथ नगर, भाग्यनगर, मित्र नगर यासह विविध भागांचा समावेश आहे. याबाबत नागरिकांनी बीड पालिकेकडे तक्रार केलेली आहे. मात्र, बीड पालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पाणी आणायचे कुठून? असा प्रश्न बीड शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पाणीटंचाईच्या परिस्थितीची दखल घेऊन तत्काळ सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असे बीड नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता राहुल टाळके म्हणाले. आम्ही वेळेवर पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, ज्या ठिकाणावरून म्हणजेच माजलगाव प्रकल्पावरून बीडला पाणीपुरवठा होतो. त्यात ठिकाणचे विद्युत पंप जळाल्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.

नगरसेवकांचे दुर्लक्ष -
बीड शहरातील स्वराज्य नगर भागात महिन्याभरापासून पिण्याचे पाणी नाही. मात्र, संबंधित प्रभागाच्या नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्याची मुजोरी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

Intro:खालील बातमी बीड शहराच्या टंचाईबाबत असून स्टोरी पॅकेज म्हणून पाठवत आहे बरोबर वीज व वाईट अपलोड केल्या आहेत
****************
एक महिन्यापासून अर्धे बीड शहर तहानलेले; दुष्काळ निवारणासाठी बीड पालिका ठरतेय अपयशी

बीड- शहरातील विविध भागात पाणीपुरवठा करण्यासाठी बीड पालिका अपयशी ठरत असल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. चक्क एक महिन्यापासून अर्ध्या बीड शहराला बीड पालिकेने पाणीपुरवठा केला नसल्याचे समोर आले आहे. बीड पालिका प्रशासनात नियोजनाचा अभाव असल्याने बीड शहराला पाणीपुरवठा वेळेत होऊ शकत नाही. माजलगाव प्रकल्पात आज घडीला 72 दलघमी पेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. असे असतानाही बीडकरांना पाणी मिळत नसल्याने बीडकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Body:बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माजलगाव प्रकल्पात 72 दलघमी पाणी साठा शिल्लक आहे. बीड शहराला एकावेळी पाणी पुरवठा करण्यासाठी 25 ते 27 एम एल डी पाणी लागते. एवढे पाणी लागत असले तरी पुढील एक महिना बीड शहराला सुरळीत पाणी पुरवठा करता येऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. असे असताना केवळ बीड पालिकेतील नियोजनाच्या अभावामुळे बीडकरांना एक महिन्यापासून पिण्याचे पाणी दिलेले नाही. ही स्थिती वारंवार निर्माण होत असल्याने बीडकरांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेला पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने देखील पाणीपुरवठ्याचा पूर्णतः खेळखंडोबा झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.

1 हजार लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात पाचशे रुपये-
बीड शहरात पालिकेच्या नियोजनाअभावी निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा परिणाम एक हजार लिटर पाण्यासाठी पाचशे रुपये सर्वसामान्य नागरिकांना मोजावे लागत आहेत. ज्यांच्याकडे पाणी विकत घेण्याची क्षमता आहे तेच पाणी विकत घेत आहेत. इतरांना मात्र सार्वजनिक ठिकाणच्या नळावर तासनतास हंडाभर पाण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. जिल्हा प्रशासन तसेच बीड नगरपालिका बीडकरांना वेळेवर पाणी देण्यासाठी सक्षम नसल्याचे चित्र आहे.

Conclusion:मागील एक महिन्यापासून बीड शहर तहानलेले आहे. यामध्ये स्वराज्य नगर, भक्ती कंस्ट्रक्शन, जिजाऊ कॉलनी, एकनाथ नगर, भाग्यनगर, मित्र नगर यासह विविध भागांचा समावेश आहे. याबाबत नागरिकांनी बीड पालिकेकडे तक्रार केलेली आहे. मात्र बीड पालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पाणी आणायचे कुठून? असा प्रश्न बीड शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. या परिस्थितीबाबत बीड नगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता राहुल टाळके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जी पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याची दखल घेऊन तात्काळ सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल. आम्ही वेळेवर पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र ज्या ठिकाणावरून म्हणजेच माजलगाव प्रकल्पावरून बीडला पाणीपुरवठा होतो. त्यात ठिकाणचे विद्युत पंप जळाल्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या.
नगरसेवकांचे होते दुर्लक्ष-
बीड शहरातील स्वराज्य नगर या भागात महिनाभरापासून पिण्याचे पाणी नाही. अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना देखील संबंधित नगरसेवकांचे दुर्लक्ष होत आहे. याशिवाय पाणी सोडणाऱ्या वालमनची मुजोरी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
Last Updated : Jun 4, 2019, 2:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.