ETV Bharat / state

सावरगाव कोविड सेंटरला 1 लाखाची देणगी - सावरगाव कोविड सेंटर

सावरगाव येथील कोविड सेंटरला आष्टी तालुक्यातील घाटा (पिंप्री) येथील आमदार सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने 1 लाख 1 हजार रुपये देणगी देण्यात आली आहे.

beed
बीड
author img

By

Published : May 23, 2021, 4:24 PM IST

आष्टी (बीड) - मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव यांच्या वतीने आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव येथे कोविड सेंटर सुरू आहे. या सेंटरला आष्टी तालुक्यातील घाटा (पिंप्री) येथील आमदार सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने 1 लाख 1 हजार रुपये देणगी देण्यात आली. तहसीलदार राजाभाऊ कदम, नामदार तहसीलदार प्रदिप पांडूळे यांच्या उपस्थितीत देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांच्याकडे ही देणगी सुपुर्द करण्यात आली.

'दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याची गरज'

'सध्याचा काळ भयान आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे', असे तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी यावेळी सांगितले. आष्टी, पाटोदा, शिरुर तालुक्यामध्ये मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगावच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटरची उभारणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी सुरु असलेली आरोग्यसेवा आणि मोफत जेवनाची व्यवस्था यातून अनेक गोरगरीब रुग्णांची सोय होत आहे. त्यामुळे सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने 1 लाख 1 हजार रुपये देणगी देण्यात आली.

हेही वाचा - सिल्लोड तालुक्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली जलसंधारण कामाची पाहणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.