ETV Bharat / state

'कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हस्तांदोलन करू नका'

डॉ. थोरात म्हणाले, नागरिकांनी कोरोना विषाणू टाळण्यासाठी कोणीही एकमेकांशी हस्तांदोलन करू नये, महाराष्ट्रीयन पद्धतीने एक दुसऱ्याला राम-राम घाला मात्र हस्तांदोलन करण्याचे टाळावे.

corona virus
'कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हस्तांदोलन करू नका'
author img

By

Published : Mar 6, 2020, 5:41 PM IST

बीड - भारतात कोरोना विषाणू संदर्भात विशेष काळजी घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोणाशीही हस्तांदोलन करू नये, असा सल्ला बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी जाहीर कार्यक्रमांमधून दिला आहे.

'कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हस्तांदोलन करू नका'

हेही वाचा - 'सुरुवातीला तर हा पुण्याचाच अर्थसंकल्प असल्यासारखं वाटलं'

बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित एका आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात बोलत होते. कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशभरात सतर्क राहण्याचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी विशेष कक्षाची स्थापना केलेली आहे. या पार्श्वभूमीवर शिबिरात मार्गदर्शन करत असताना डॉ. थोरात म्हणाले, नागरिकांनी कोरोना विषाणू टाळण्यासाठी कोणीही एकमेकांशी हस्तांदोलन करू नये, महाराष्ट्रीयन पद्धतीने एक दुसऱ्याला राम-राम घाला मात्र हस्तांदोलन करण्याचे टाळा असा, सल्ला शल्यचिकित्सक डॉ. थोरात यांनी उपस्थित नागरिकांना दिला आहे. ती खबरदारी येणाऱ्या काही दिवसांसाठी आपल्या प्रत्येकाला घेणे आवश्यक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा - दिल्ली हिंसाचराच्या मुद्द्यावरून काँग्रेस खासदार आक्रमक, संसदेबाहेर आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.