ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या रेखा फड यांना दोन वर्षांची सक्तमजुरी;पोलीस अधीक्षक कार्यालयात घातला होता गोंधळ

author img

By

Published : Oct 16, 2019, 11:38 PM IST

पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घातल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या परभणी जिल्ह्याच्या निरीक्षक तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा रेखा फड यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा रेखा फड

बीड - पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घातल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या परभणी जिल्ह्याच्या निरीक्षक तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा रेखा फड यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

4 सप्टेंबर 2018 साली सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात रेखा फड आपल्या काही महिला कार्यकर्त्यांसह तत्कालीन अधीक्षक जी. श्रीधर यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, अधीक्षक जी. श्रीधर हे कार्यालयीन कामकाजात व्यग्र होते. त्यांच्याकडे कार्यालयातील कर्मचारी महत्त्वाचे काम घेऊन कक्षात असल्याने फड यांना भेटीसाठी काहीवेळ प्रतीक्षा करावी लागली. अधीक्षकांच्या भेटीसाठी विलंब होऊ लागल्याने रेखा फड यांनी स्वागत कक्षात गोंधळ घातला. कक्षात कार्यरत महिला कर्मचारी अनिता दगडखैर यांच्याशी त्यांनी हुज्जत घालून मारहाणीची धमकी दिली. यानंतर शिवीगाळ करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.

अनिता दगडखैर यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांत रेखा फड यांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणणे यासह इतर काही कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

फौजदार मनीषा जोगदंड यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. डी. एन. खडसे यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. यात रेखा फड यांचा गुन्हा सिद्ध होत असल्याने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. बी.एस राख यांनी बाजू मांडली त्यांना अॅड. ए.बी तिडके यांनी सहकार्य केले.

Intro:राष्ट्रवादीच्या रेखा फड यांना दोन वर्षाची शिक्षा;
पोलीस अधीक्षक कार्यालयात घातला होता गोंधळ

बीड- पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घातल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात राष्ट्रवादीच्या परभणी जिल्ह्याच्या निरीक्षक तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्ष रेखा फड यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली .
४ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात रेखा फड आपल्या काही महिला कार्यकर्त्यांसह तत्कालीन अधीक्षक जी. श्रीधर यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, अधीक्षक जी. श्रीधर हे कार्यालयीन कामकाजात व्यस्त होते, त्यांच्याकडे कार्यालयातील कर्मचारी महत्त्वाचे काम घेऊन कक्षात असल्याने फड यांना भेटीसाठी काहीवेळ प्रतीक्षा करावी लागली.

अधीक्षकांच्या भेटीसाठी विलंब होऊ लागल्याने रेखा फड यांनी स्वागत कक्षात गोंधळ घातला. कक्षात कार्यरत महिला कर्मचारी अनिता दगडखैर यांच्याशी त्यांनी हुज्जत घालून मारहाणीची धमकी दिली, शिवीगाळ करुन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.
अनिता दगडखैर यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांत रेखा फड यांच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणणे यासह इतर कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. फौजदार मनीषा जोगदंड यांनी तपास करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. डी. एन. खडसे यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली. यात रेखा फड यांचा गुन्हा सिद्ध होत असल्याने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बी. एस. राख यांनी बाजू मांडली त्यांना ॲड. ए. बी. तिडके यांनी सहकार्य केले.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.