बीड: जवाहर एज्युकेशन सोसायटीची 34 सभासदांसाठी निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आश्रयदाता सभासद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला; मात्र आमदार धनंजय मुंडेंविरुद्ध एकही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भगवानगडावरील मनोमिलनानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेंच्या वाट्याला सदस्यपद आले.
अशी पलटली बाजी: इतर जागेवर तडजोडीचे राजकारण सर्व पक्षांकडून केले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता झाली होती. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात हितचिंतक गटातून एक अर्ज आला होता. अटीतटीच्या या लढ्यात इतर 33 जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे चित्र दिसत होते.