ETV Bharat / state

आरोपातून सावरत धनंजय मुंडेंची कामाला सुरुवात, भरवला जनता दरबार - धनंजय मुंडे लेटेस्ट न्यूज बीड

आपल्यावर झालेल्या आरोपातून सावरत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. मंगळवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयात ध्वाजारोहण करण्यात आले. ध्वाजारोहणानंतर त्यांनी जिल्हावासीयांना शुभेच्छा संदेश दिला.

आरोपातून सावरत धनंजय मुंडेंची कामाला सुरुवात

author img

By

Published : Jan 27, 2021, 4:52 PM IST

Updated : Jan 27, 2021, 8:18 PM IST

परळी (बीड) - आपल्यावर झालेल्या आरोपातून सावरत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. मंगळवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयात ध्वाजारोहण करण्यात आले. ध्वाजारोहणानंतर त्यांनी जिल्हावासीयांना शुभेच्छा संदेश दिला. यावेळी त्यांनी कोव्हिड लसीकरण मोहिमेसह जिल्ह्यातील चालू व प्रस्तावित विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला.

दरम्यान यावेळी धनंजय मुंडे त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत देखील बोलले, माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांमधून काहीही निष्पन्न झाले नाही, उलट तक्रारदार महिलेनेच दिलेली तक्रार मागे घेतली. जिल्ह्यातील नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी या कठीण काळात मला मोलाची साथ दिली, माझ्यावर विश्वास ठेवला, मी त्या सर्वांचे आभार मानतो. लोकांचे हे प्रेम, आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी प्रत्यक्ष भगवंताचा प्रसाद असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे.

मुंडेंचे समर्थकांकडून जंगी स्वागत

धनंजय मुंडे यांनी घेतल्या आंदोलकांच्या भेटी

धनंजय मुंडे यांनी शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर बीड जिल्हाधिकारी कार्यालय व सामाजिक न्याय भवन परिसरात विविध आंदोलन व उपोषणकर्त्यांच्या भेटी घेतल्या. थकीत वेतनाच्या मागणीसाठी वडझरी येथील संत शिरोमणी भगवानबाबा प्राथमिक आश्रम शाळेतील कर्मचारी अमरण उपोषणाला बसले होते. मुंडे यांनी त्यांची भेट घेऊन, येत्या दोन दिवसांमध्ये या कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांना मिळावे, असे आदेश त्यांनी समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांना दिले आहे. मुंडे यांच्या आदेशानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे. दरम्यान त्यानंतर त्यांनी चारा छावणी धारकांच्या थकीत देयकांसबंधीच्या उपोषणास भेट देत, त्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यानंतर मुंडे यांनी सामाजिक न्याय भवन परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या गायरान हक्क आंदोलनाला देखील भेट दिली. यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, हा माझ्या विभागाचा विषय आहे, मला येऊन भेटला असतात तर वयोवृद्ध व्यक्तींवर, माय माऊल्यांवर आंदोलनाची वेळ येऊ दिली नसती. तुमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील असे अश्वासन यावेळी धनंजय मुंडे यांनी या आंदोलकांना दिले.

मुंडेंनी भरवला जनता दरबार

विविध कार्यक्रमानंतर विश्राम गृह येथे शेकडोंच्या गर्दीत नेहमीप्रमाणे जनता दरबार घेत धनंजय मुंडे यांनी आलेल्या सर्वांची निवेदने स्वीकारली. यावेळी मुंडेंनी चक्क विश्रामगृहाच्या दारात, गाडीच्या बोनटवर निवेदनांवर स्वाक्षरी करून, संबंधित विभागाला आदेश निर्गमित केले. दरम्यान बीड येथून लोणी ता. शिरूर कासार येथे संत खंडोजीबाबा यांच्या स्मृती सप्ताहास भेट द्यायला निघालेल्या मुंडेंचे रस्त्यातील प्रत्येक गावात स्थानिक नागरिक व समर्थकांनी जंगी स्वागत केले. शिरूर कासार शहरातील प्रमुख चौकात तर जेसीबीने फुले उधळत व क्रेनने शेकडो किलोचा हार घालून समर्थकांनी मुंडेंचे जंगी स्वागत केल्याचे पाहायला मिळाले.

Last Updated : Jan 27, 2021, 8:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.