ETV Bharat / state

Dhananjay Munde entry in Cricket: राजकारणानंतर धनंजय मुंडेंचे आता क्रिकेटविश्वात पदार्पण - धनंजय मुंडे

पुण्यात होणाऱ्या एमपीएल (महाराष्ट्र प्रीमिअर लीग) मध्ये खेळणा-या मराठवाड्याच्या छत्रपती संभाजी किंग्ज संघाची फ्रेंचाईजी धनंजय मुंडेंकडे आहे. पुण्यामध्ये ही स्पर्धा 16 ते 29 जून दरम्यान गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे. राज्याच्या सहा विभागातून सहा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

Dhananjay Munde entry in Cricket
धनंजय मुंडे यांची क्रिकेटमध्ये एन्ट्री
author img

By

Published : Jun 9, 2023, 10:11 AM IST

धनंजय मुंडे यांची क्रिकेटमध्ये एन्ट्री

बीड : पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केले आहे. सीएसकेचा राजवर्धन हंगरगेकर छत्रपती संभाजी किंग्जचा आयकॉन खेळाडू आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळण्यासाठी धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे.

Dhananjay Munde entry in Cricket
छत्रपती संभाजी किंग्स संघ

छत्रपती संभाजी किंग्स संघाची फ्रंचाईजी : छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रंचाईजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे. आज मुंडे यांनी संघाच्या प्लेअर बरोबर पुण्यातील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर सराव केला आहे. यावेळी त्यांनी चौकार, षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. नेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने प्रथमच राज्य स्तरावरील क्रिकेट विश्वातही पदार्पण केले आहे.

Dhananjay Munde entry in Cricket
धनंजय मुंडे यांची क्रिकेटमध्ये एन्ट्री

आयकॉन प्लेयर्स नियुक्त : या लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्स, पुणेरी बाप्पा, ईगल नाशिक टायटन्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर रॉयल्स आणि धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हे सहा संघ सहभागी होत आहेत. सर्वच संघांनी आपले आयकॉन प्लेयर्स नियुक्त केले आहे. या संघात खेळाडूंच्या बोलीकडून झालेल्या सिलेक्शननंतर या संघात एकूण 22 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यातील 11 खेळाडू हे मराठवाड्यातील आहेत. निशांत नगरकर, कुणाल कोठावळे, अभिषेक ताटे हे तीन खेळाडू रिझर्वमध्ये आहेत.

ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना संधी : खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी नेटमध्ये खेळाडूंसह प्रॅक्टिस केली. मराठवाड्यासह ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंना संधी दिली आहे. या महाराष्ट्र प्रीमिअर लीगचा मूळ उद्देश हा ग्रामीण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा आहे. मी स्वतः त्यामुळे एका टीमची जबाबदारी घेतली आहे. आमचा संघ या होणाऱ्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करेल, असे यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.

हेही वाचा :

  1. Vaidyanath Sugar Factory: वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध; धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र
  2. Pankaja Munde Vs Dhananjay Munde : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी मुंडे बहीण भावात पुन्हा संघर्ष
  3. Dhananjay Munde Rescued Youth: धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे काठमांडूमध्ये अडकलेल्या आठ तरुणांची सुटका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.