ETV Bharat / state

भाजपच्या सत्ता, पैसा अन् भावनिकते विरुध्द सामान्य माणसाच्या विकासाची लढाई - धनंजय मुंडे - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

भाजपच्या सत्ता, पैसा अन् भावनिकते विरुध्द सामान्य माणसाच्या विकासाची लढाई, असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केले. परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात हालगे गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

धनंजय मुंडे
author img

By

Published : Sep 23, 2019, 9:07 PM IST

बीड - विधानसभेची निवडणूक ही भाजपच्या सत्ता, पैसा आणि भावनिकते विरुध्द माझी सामान्य माणसाच्या विकासाची लढाई आहे. मतदार संघातील प्रत्येक माणसाचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. 22 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली त्यात कधी कमी पडलो नाही. या सेवेची मताच्या आशीर्वादाच्या रुपाने परतफेड करा, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

हेही वाचा - 'घरफोड्या करणार्‍यांचा पक्ष आता बुडणार'

परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात हालगे गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चाणक्य संस्थेचे राम भोजने यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तर ज्येष्ठ नेते दत्ताआबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

भरल्या ताटावरून मला उठवले-

2009 च्या निवडणुकीतच मी आमदार झालो असतो. मात्र, मला भरल्या ताटावरून उठवण्यात आले. 22 वर्षांपासून तुमची सेवा करतो आहे. कर्ज काढले, अनेक हालअपेष्टा सहन केल्या, जमिनी विकल्या. मात्र, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आणि जनतेच्या सेवेत कधी कमी पडलो नाही. आताची ही माझी लढाई कोणत्या व्यक्ती विरुध्द नाही तर मतदारसंघाच्या विकासासाठी आहे, असे मुंडेंनी सांगितले.

विश्वासघात करू नका -

सरकारच्या कारभारात टाचणी पडल्याच्या घटनेचीही मला माहिती मिळते. त्यामुळे कोणता कार्यकर्ता विरोधात काम करत आहे, हे समजत नाही, असे समजु नका. ज्यांना विरोधात काम करायचे आहे, त्यांनी सांगून बाहेर पडा. सोबत राहून विश्वासघात करू नका. जय-पराजय काहीही होईल ह्रदयात रहा, डोक्यात राहू नका, यावेळी चुकीला माफी नाही, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.

दुप्पट उत्पादनाचे स्वप्न -

जायकवाडीचे पाणी वाण धरणात आणणे, नवीन साठवण तलाव, थर्मल सुरू करणे, एम.आय.डी.सी. उभारणी या माध्यमातून प्रत्येक माणसाचा आर्थिक विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. स्वप्नातील मतदारसंघ घडवण्यासाठी आशीर्वाद देण्याची विनंती मुंडेंनी जनतेला केली. या मेळाव्याचे सूत्रसंचलन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले. मेळाव्यास मतदारसंघातील पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - नमिता मुंदडा देणार राष्ट्रवादीला 'सोडचिठ्ठी'? 'या' पोस्टमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण

Intro:भाजपच्या सत्ता, पैसा आणि भावनिकते विरूध्दची माझी सामान्य माणसाच्या विकासाची लढाई- धनंजय मुंडे

बीड- विधानसभेची निवडणूक ही भाजपाच्या सत्ता, पैसा आणि भावनिकता विरूध्दची माझी सामान्य माणसाच्या विकासाची लढाई आहे. मतदार संघातील प्रत्येक माणसाचे उत्पन्न दुप्पट होईल असा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. 22 वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली त्यात कधी कमी पडलो नाही, या सेवेची मताच्या आशिर्वादाच्या रूपाने परतफेड करा असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. 

परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात हालगे गार्डन मध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चाणक्य संस्थेचे राम भोजने यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तर ज्येष्ठ नेते दत्ताआबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

भरल्या ताटावरून मला उठवले-

         2009 च्या निवडणूकीतच मी आमदार झालो असतो मात्र मला भरल्या ताटावरून उठवण्यात आले. 22 वर्षांपासून तुमची सेवा करतो आहे, कर्ज काढले, अनेक हालअपेष्टा सहन केल्या, जमिनी विकल्या मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणूकीत आणि जनतेच्या सेवेत कधी कमी पडलो नाही. आताची ही माझी लढाई कोणत्या व्यक्ती विरूध्द नाही तर मतदार संघाच्या विकासासाठी आहे. तुमच्या निवडणूकीत मी कधीच कमी पडलो नाही, माझ्या निवडणूकीतच हा विरोध का ? असा प्रश्न विचारत शुल्लक गोष्टीकडे ही दूर्लक्ष करू नका तुमचा आजचा जोश पाहूनच आपला विजय निश्चित झालेला आहे. 

विश्वासघात करू नका-

         सरकारच्या कारभारात टाचणी पडल्याच्या घटनेची ही मला माहिती मिळते, त्यामुळे कोणता कार्यकर्ता विरोधात काम करत आहे, हे समजत नाही, असे समजु नका. ज्यांना विरोधात काम करायचे आहे त्यांनी सांगून बाहेर पडा, सोबत राहून विश्वासघात करू नका, जय-पराजय काहीही होईल र्‍हदयात रहा, डोक्यात राहू नका यावेळी चूकीला माफी नाही असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनाही प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. 

दुप्पट उत्पनाचे स्वप्न-

         जायकवाडीचे पाणी वाण धरणात आणणे, नवीन साठवण तलाव, थर्मल सुरू करणे, एम.आय.डी.सी. उभारणी या माध्यमातून प्रत्येक माणसाचा आर्थिक विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. स्वप्नातील मतदार संघ घडवण्यासाठी आशिर्वाद देण्याची विनंती त्यांनी केली. या मेळाव्याचे सुत्रसंचलन गोविंद महाराज केंद्रे यांनी केले, मेळाव्यास मतदार संघातील पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.