मुंबई - परळी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बॉम्बे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तब्येत उत्तम असून, काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे ट्विट मुंडे यांनी केले आहे.
-
पोटदुखी च्या त्रासाने तपासणीसाठी आ.धनंजय मुंडे साहेब मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद 🙏
— OfficeofDM (@OfficeofDM2) October 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">पोटदुखी च्या त्रासाने तपासणीसाठी आ.धनंजय मुंडे साहेब मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद 🙏
— OfficeofDM (@OfficeofDM2) October 30, 2019पोटदुखी च्या त्रासाने तपासणीसाठी आ.धनंजय मुंडे साहेब मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद 🙏
— OfficeofDM (@OfficeofDM2) October 30, 2019
हेही वाचा - ओल्या दुष्काळाचा बळी, सिल्लोडच्या शेतकऱ्याची पुण्यात आत्महत्या
बुधवारी अचानक धनंजय मुंडे यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे लगेच ते बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले. यासंबंधी मुंडे यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. 'कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. माझी प्रकृत्ती उत्तम आहे', असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच सदिच्छेबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.