ETV Bharat / state

मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूमसह मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा - धनंजय मुंडे - इलेक्शन बातम्या 2019

मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती आहे. त्यामुळे, निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता कायम रहावी या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे, मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये आणि मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.

धनंजय मुंडे
author img

By

Published : Oct 18, 2019, 2:20 PM IST

Updated : Oct 18, 2019, 4:06 PM IST

बीड - विधानसभा निवडणुकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा. तसेच मतदान ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मागील काही निवडणुकांपासून देशात ईव्हीएम मशीन हॅकींगची जोरदार चर्चा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी केलेल्या या मागणीला सध्या महत्व प्राप्त झाले आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भीती आहे. त्यामुळे, निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता कायम रहावी या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - केज विधानसभा जुन्यांना संतुष्ट करताना मुंदडांची दमछाक; गटबाजी शमवण्याचे आव्हान

त्यासाठी सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये आणि मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावे. तसेच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्यात यावी, अशी विनंती मुंडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे विनंती केली आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीच्या रेखा फड यांना दोन वर्षांची सक्तमजुरी;पोलीस अधीक्षक कार्यालयात घातला होता गोंधळ

Intro:मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवा- धनंजय मुंडेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

बीड- विधानसभा निवडणूकीच्या मतपेट्या ठेवलेल्या स्ट्राँंगरूम आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवावा तसेच मतदान ते मतमोजणी प्रक्रीया पुर्ण होईपर्यंत या परिसरातील मोबाईल टॉवरही बंद ठेवावेत अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

मागील काही निवडणूकांपासून देशात ए.व्ही.एम. मशिन हॅकींगची जोरदार चर्चा होत आहे, त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी केलेल्या या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. मतदानासाठी वापरण्यात येणार्‍या मतदान यंत्राशी मोबाईल टॉवर्स आणि वायफायच्या माध्यमातून छेडछाड होण्याची भिती असून, निवडणूक प्रक्रीयेतून निष्पक्षता कायम रहावी या दृष्टीने आयोगाने सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

सुरक्षेचा उपाय म्हणून मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये व मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रात जॅमर बसवण्यात यावेत, तसेच या दोन्ही जागांच्या परिसरातील मोबाईल टॉवर यंत्रणा दि.21 ऑक्टोबर, 2019 ते दि.24 ऑक्टोबर, 2019 पर्यंत बंद करण्यात यावेत, अशी विनंती त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, परळी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे केली आहे.Body:बConclusion:ब
Last Updated : Oct 18, 2019, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.