परळी (बीड) - पाण्याच्या शोधात असलेल्या एका हरणाला अज्ञात मोटार सायकलने धडक दिल्यामुळे हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवार (आज) दुपारच्या सुमारास केज अंबाजोगाई मार्गावर घडली आहे.
दुपारच्या दरम्यान केज ते अंबाजोगाई महामार्गावर होळपासून पुढे कोदरी पाटी जवळ एका अज्ञात दुचाकीने मादी जातीच्या हरणाला धडक दिली आहे. या धडकेत हरणाचा जागीच मृत्यू झाला आहे. पाच हरणाचा कळप हा पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडीत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्याच धडकेत एका हरणाचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती अंबाजोगाईकडे जाणारे गौतम बचुटे यांनी धारूर वनविभागाचे वनाधिकारी मुंडे व धस यांना दिली आहे. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा-टाटा -सायरस मिस्त्री वाद; सर्वोच्च न्यायालयाकडून एनसीएलएटीचे आदेश रद्द
हेही वाचा-वनअधिकारी दीपाली चव्हाण यांची आत्महत्या, उपवनसंरक्षक विनोद शिवकुमारला अटक