ETV Bharat / state

तोंड दाबून बुक्क्यांचा मार : शिक्षक भरतीवरून प्रश्न विचारणाऱ्या महिला उमेदवारालाच शिक्षणमंत्री केसरकरांची तंबी - श्रीक्षेत्र कपिलधार

बीडमध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारणाऱ्या महिलेलाच त्यांनी तंबी दिली. यावरुन केसरकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. शिक्षण भरतीमधील त्रुटी सांगणाऱ्या महिला उमेदवारालाच मंत्र्यांनी तंबी दिल्यानं खळबळ उडाली आहे. बीडच्या श्रीक्षेत्र कपिलधार इथं हा प्रकार घडला.

Minister of Education Deepak kesarkar
दीपक केसरकर आणि महिला उमेदवारात शाब्दिक चकमक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 4:02 PM IST

दीपक केसरकर आणि महिला उमेदवारात शाब्दिक चकमक

बीड : राज्यात शिक्षक भरती नसल्यामुळं अनेक उमेदवार डी. एड., बी. एड. करूनही नोकरी नसल्यामुळं अडचणीत आहेत. शिक्षक भरती प्रक्रिया सुधारण्याची गरज आहे. मात्र बीड येथे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी एका महिला उमेदवाराला, "तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिसक्वालिफाय करायला लावेन," अशी धमकी दिली. बीड येथील कपिलधारच्या लिंगायत समाज धर्मसभेनंतर पत्रकारांशी केसरकर बोलत होते. त्यावेळी एका तरुणीनं केसरकर यांना शिक्षक भरती कधी करणार असं विचारलं असता केसरकर उत्तर देता-देता तिच्यावरच भडकले. एकीकडं नोकर भरती होत नाहीय, दुसरीकडं भरती काढली तरी त्याची प्रक्रिया पुढं सरकत नाहीये. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही वाट पाहतोय. वेबसाईट सुरू झाली, रजिस्ट्रेशनही सुरू झालंय, परंतु प्रोसिजर पुढं जात नाहीये, अशी माहिती एक भावी शिक्षिका मंत्र्यांना तिथं देत होती. केसरकर यांनी तिच्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्याऐवजी तिलाच बेशिस्त वर्तन करत असल्याचं सांगून भरती प्रक्रियेतील त्रुटींवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.

काय म्हणाले शिक्षण मंत्री : "तुम्हाला अजिबात कळत नाही. तुम्ही शिक्षक होऊ शकता का? तुमचा चॉईस दिला पाहिजे", असं केसरकर म्हणाले. यावर त्या तरुणीनं जाहिरातच आली नाहीये, असं सांगितलं. यावर प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितली आहे, असं केसरकर म्हणाले. यावर तिनं कधीपर्यंत येणार असं विचारलं असता केसरकरांनी ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी करू शकत नाही. तुम्ही कसे मुलांना शिकविणार? तुम्हाला माहितीये की साईट ओपन झालीय, मग तुम्ही कसे आला मला विचारायला. थोडी श्रद्धा आणि सबुरी ठेवत जा. आज पाच वर्षांत कोणी भरती केली का? मी केली ना? मला तुम्ही नंतरही भेटू शकला असता, असा सवाल केसरकर यांनी केला. मी जेवढा प्रेमळ तेवढाच मी कडक सुद्धा आहे. माझ्या दृष्टीनं विद्यार्थी महत्वाचा आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असेल मी 30 हजार नोकऱ्या उपलब्ध केल्या आहेत. परंतु, उद्या जर तुम्ही विद्यार्थ्यांना बेशिस्त शिकवणार असाल, तर मला शिस्तीनं शिकविणारे शिक्षकच पाहिजेत. माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही हे मला अजिबात मान्य नाही. मी तुमच्या तोंडावर सांगतो. विद्यार्थी हा उद्याच्या महाराष्ट्राचं भवितव्य आहे, अजिबात मध्ये बोलायचं नाही, नाहीतर तुमचं नाव घेऊन मी डिसक्वालिफाय करायला लावेन, अशी धमकी केसरकर यांनी पत्रकारांसमोर त्या तरुणीला दिली आहे.

तोंड दाबून बुक्क्यांचा मार - शिक्षण मंत्र्यांनी जाहीरपणे पत्रकारांच्या समोरच अशी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर टीका होत आहे. व्यवस्था सुधारण्याऐवजी त्रुटी दाखवणाऱ्यावरच चिडणाऱ्या सरकारमधील मंत्र्यांवर आता टीका होत आहे. व्यवस्था सुधारण्याऐवजी अशा पद्धतीनं प्रश्न घेऊन येणाऱ्यांवर एक मंत्री जाहीरपणे वक्तव्य करत असल्यानं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ होतकरु उमेदवारांच्यावर आल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

  1. मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली, संभाजीराजे छत्रपती दिल्लीमध्ये दाखल, पहा व्हिडिओ
  2. ज्यूंच्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर एलॉन मस्कला उपरती, इस्त्रायलमध्ये जाऊन 'ही' घेतली माहिती
  3. दारुड्यांनी गाड्या अडवून लुटलं; विरोध करणाऱ्या माजी सैनिकाचा पत्नी मुलांसमोर भरस्त्यात खून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.