ETV Bharat / state

Crop Loan Beed बीडमध्ये १२ हजार शेतकऱ्यांना परत करावी लागणार पीक विम्याची रक्कम, कंपनीने केला तांत्रिक चुकीचा दावा - पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे वांदे

खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्यामुळे बजाज अलियांझ कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा ( Crop Loan Credit In Farmers Account ) केली.मात्र बीड जिल्ह्यातील 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात चुकीने रक्कम जमा झाल्याचे उघड झाले. त्यामुळे या शेतकऱ्यांना जमा झालेली रक्कम ( Bajaj Allianz Company Claim In Beed ) कंपनीकडे परत करावी लागणार आहे. याबाबत कंपनीकडे शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, तांत्रिक कारणाने ही रक्कम जमा ( Farmers Account ) झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Crop Loan Beed
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 5, 2023, 3:18 PM IST

बीड - खरीप हंगामातील पीक विम्याच्या नुकसान भरपाईचे वांदे बीड जिल्ह्यात चालू आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप २०२२ चा पीक विमा ( Crop Loan Credit In Farmers Account ) जमा झाला आहे. मात्र आता त्यातील १२ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना तांत्रीक कारणाने सदर रक्कम मिळाल्याचा दावा बजाज आलियान्झ ( Bajaj Allianz Company Claim In Beed ) या विमा कंपनीने केला आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यातून ( Farmers Account ) ही रक्कम तात्काळ कंपनीच्या खात्यात वर्ग करावी, असे पत्रच विमा कंपनीने अग्रणी बँक अधिकाऱ्यांना दिले आहे.

तांत्रिक चुकीने पीक विमा जमा झाल्याचा कंपनीला साक्षात्कार बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मागच्या महिन्यात खरिपाचा पीकविमा ( Crop Loan In Farmers Account ) आला आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष देखील झालेला आहे. यातून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला आहे. त्यातच बजाज आलियान्झ या कंपनीकडून अनेकांच्या खात्यावर खरीप पीक विम्याची नुकसान भरपाई जमा करण्यात आली होती. मात्र आता सदर नुकसान भरपाई तांत्रिक चुकीने जमा करण्याचा साक्षात्कार विमा कंपनीने केला आहे.

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि यात अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यावर 30 डिसेंबरला सदर रक्कम पाठवण्यात आली. मात्र ही रक्कम कशी गेली याच्याविषयी कंपनीचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क केला असता प्रतिनिधी मात्र कुठलेही उत्तर देण्यास तयार नाहीत. त्यामुळे नेमकी ही रक्कम गेली कशी आणि यामागचे कारण काय हे अजूनही स्पष्ट झाले नाही. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात 2020 च्या पीक विम्यासाठी अनेक वेळा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले. अनेक वेळा शेतकरी रस्त्यावर आला. अनेक वेळा शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना सुद्धा पीक विमा कंपनी द्यायला तयार नव्हती. अजूनही काही शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी एकीकडे ओरडत असताना एवढी रक्कम दिली कशी हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

बँक निहाय शेतकरी संख्या लागणारी रक्कम महाराष्ट्र ग्रामीण बैंक ४८५० (४ कोटी ५० लाख), एसबीआय ४३७९ ( ४ कोटी ३६ लाख), जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक - २१३४ (२ कोटी ४ लाख), महाराष्ट्र बैंक - ९०४ (८१ लाख ३४ हजार) या प्रमुख बैंकासह इतर सर्व बँकांच्या वेगवेगळ्या शाखेतील खात्यांमध्ये सदर रक्कम जमा झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.