ETV Bharat / state

मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात‌

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अदृश्य अशा शत्रू विरोधात संपूर्ण जग लढताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस ग्रामीण भागामध्ये वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढणारा मृत्यूदर हे गंभीर विषय आहेत. सोबतच, मोहा शिवारामध्ये सुद्धा दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशान्वये जि.प.कें.प्रा.शाळा मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.

मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात‌
मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात‌
author img

By

Published : May 26, 2021, 9:20 PM IST

परळी‌ - संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अदृश्य अशा शत्रू विरोधात संपूर्ण जग लढताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस ग्रामीण भागामध्ये वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढणारा मृत्यूदर हे गंभीर विषय आहेत. सोबतच, मोहा शिवारामध्ये सुद्धा दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशान्वये ग्रामपंचायत कार्यालय मोहा व प्राथमिक आरोग्य केंद्र मोहा यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.कें.प्रा.शाळा मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. अशा प्रकारचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करणारी मोहा ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.

या विलगीकरण केंद्राचे उद्घाटन परळी तहसीलचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विष्णुपंत देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर लक्ष्मण मोरे, सरपंच प्रतिनिधी पांडुरंग शेप, सिरसाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे आदी उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या योग्य नियोजनाचे कौतुक केले व सदरील विलगीकरण केंद्रामुळे मोहा गावातील रुग्ण संख्या शून्य होण्यास मदत होणार आहे. अशा कक्षांचे उद्घाटन करताना आनंद होत नसून दुःख आणि मनामध्ये खेद होत आहे. कारण समाजावर आतापर्यंत अशा महामारीची वेळ कधीही आली नव्हती आणि इथून पुढेही अशी वेळ येऊ नये, असे म्हटले.

प्रत्येक गावात विलगीकरण कक्षाची गरज

यावेळी बोलताना तालुका आरोग्याधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे यांनी म्हटले की, असे विलगीकरण कक्ष गावोगावी स्थापन करण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे गावामध्ये या विषाणूचा संसर्ग होणार नाही. एका रुग्णामुळे इतर सुद्धा बाधीत होत असल्याने अशा व्यक्तींना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात यावे. सोबतच संशयित रुग्णांच्या चाचण्या करून त्यांना सुद्धा विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्यास आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकतो.

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांसाठी राज्य सरकारची 250 कोटींची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.