ETV Bharat / state

वाऱ्यावर सोडत आई-वडिलांनी केले दुसरे लग्न; बीडच्या स्वाधार गृहात राहून 'ती'ने पूर्ण केली बारावी - beed brave girl

बीड येथील स्वाधार गृहात साधारणतः 3 वर्षांपूर्वी अल्पवयीन असताना सुमन आली होती. आईने अल्पवयीन असताना लग्नाच्या बहाण्याने एका व्यक्तीला सुमनला विकलेच होते. मात्र, या सगळ्या परिस्थितीवर मोठ्या धाडसाने मात केली आणि घरातून पळ काढला. यानंतर थेट संबंधित पोलीस ठाणे गाठले. सुमन अल्पवयीन असल्यामुळे बाल समितीने सुमनला न्याय दिला आणि बीड येथील एका स्वाधार गृहात तिची रवानगी केली.

स्वाधार गृह बीड
स्वाधार गृह बीड
author img

By

Published : Mar 3, 2020, 6:27 PM IST

Updated : Mar 3, 2020, 8:35 PM IST

बीड - अल्पवयीन असतानाच पोटच्या पोरीला सोडून आई-वडिलांनी दुसरे लग्न केले. या आई-वडिलांनी बालवयातच तिचे एका व्यक्तीशी लग्न जमवले होते. त्याबदल्यात त्यांनी त्या व्यक्तीकडून पैसेही घेतले होते. मात्र, यानंतर त्या मुलीने लग्नाला विरोध केला आणि थेट पोलीस ठाणे गाठले. यांनतर पोलिसांच्या माध्यमातून बाल समितीच्या आदेशानुसार सुधार गृहात ती वास्तव्यास आली. यानंतर बीड येथील स्वाधार गृहात राहून त्या मुलीने जिद्दीने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुमन (नाव बदलले आहे) असे या लढवय्या तरूणीचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने 'टीव्ही भारत' तिचा प्रवास जाणून घेतला.

वाऱ्यावर सोडत आई-वडिलांनी केले दुसरे लग्न; बीडच्या स्वाधार गृहात राहून 'ती'ने पूर्ण केली बारावी

बीड येथील स्वाधार गृहात साधारणतः 3 वर्षांपूर्वी अल्पवयीन असताना सुमन आली होती. आईने अल्पवयीन असताना लग्नाच्या बहाण्याने सुमनला एका व्यक्तीला विकलेच होते. मात्र, या सगळ्या परिस्थितीवर मोठ्या धाडसाने मात केली आणि घरातून पळ काढला. यानंतर थेट संबंधित पोलीस ठाणे गाठले. सुमन अल्पवयीन असल्यामुळे बाल समितीने सुमनला न्याय दिला आणि बीड येथील एका स्वाधार गृहात तिची रवानगी केली.

हेही वाचा - 'लग्न झालेल्या व्यक्तीच्या प्रेमात पडू नका', नीना गुप्तांनी दिला सल्ला

सुधारगृहात आल्यानंतर सुमनच्या नव्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. खेळण्या-बागडण्याच्या दिवसांमध्ये आई-बापांनी तिला या संकटात सोडले होते. सुमनने घर सोडल्यांनतर तिच्या जन्मदात्या आई आणि वडिलांनी विभक्त होत दोघांनीही दुसरे लग्न केले. आज आई-बापांचे वेगवेगळे संसार सुरू आहेत. मात्र, तिच्या आयुष्याची लक्तरे झाली आहेत.

आता 'ती' बारावी पास झाली आहे. तिला तिच्या आयुष्यातील 'आपबीती' विसरून पुढे चांगलं शिकायचे आहे आणि खूप मोठे व्हायचे आहे. मात्र, यासाठी तिला समाजाच्या मदतीची गरज आहे, अशी अपेक्षा तिने 'ईटिव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली आहे.

Last Updated : Mar 3, 2020, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.