ETV Bharat / state

कोरड्या नद्या जोडून महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडणार नाही; जलतज्ञ एच. एम. देसरडा यांचे मत - वॉटर हार्वेस्टिंग महाराष्ट्र सरकार

कोरड्या नद्या जोडून या महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडणार नाही. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून 'वॉटर हार्वेस्टिंग नव्हे तर मनी हार्वेस्टिंग करत असल्याचा आरोप नियोजन आयोगाचे माजी सदस्य तथा जलतज्ञ एच. एम. देसरडा यांनी केला आहे. रविवारी (18ऑगस्ट) बीडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरडया नद्या जोडून महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडणार नाही
author img

By

Published : Aug 18, 2019, 6:44 PM IST

बीड - सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून मराठवाड्यासह महाराष्ट्रात 'वॉटर ग्रीड' योजना राबवू इच्छित आहे. मात्र, कोरड्या नद्या जोडून या महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडणार नाही. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून 'वॉटर हार्वेस्टिंग नव्हे तर मनी हार्वेस्टिंग करत असल्याचा आरोप नियोजन आयोगाचे माजी सदस्य तथा जलतज्ञ एच. एम. देसरडा यांनी केला आहे. रविवारी (18ऑगस्ट) बीडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

कोरड्या नद्या जोडून महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडणार नाही

देसरडा पुढे म्हणाले, मी 1972 पासून महाराष्ट्राच्या जलस्थितीचा अभ्यास करत आहे. राज्य आणि केंद्राच्या अनेक समित्यांवर मी काम केले आहे. महाराष्ट्राचे चित्र आजच्या घडीला अस्वस्थ करणारे आहे. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला कुठलाच आधार नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून जलयुक्त शिवार योजना राबवली गेली. त्या योजनेचा आढावा घेतला तर परिस्थिती गंभीर आहे. जलयुक्त शिवार योजनेत भाजप सरकारला अपयश आलेले आहे. जलयुक्त शिवाय योजना यशस्वी झाली, असे सत्तेवर असलेल्या सरकारला वाटत असेल तर मग फडणवीस सत्तेवर आल्यापासून राज्यात 14,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या, असा संतप्त सवालही देसरडा यांनी केला आहे.

याशिवाय, कोल्हापूर, सांगली येथील जलसंकट हे आसमानी नसून सुलतानी आहे. भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असा आरोपदेखील देसरडा यांनी केला आहे.

Intro:कोरडया नद्या जोडून महाराष्ट्राच्या पदरात काहीच पडणार नाही; जलतज्ञ एच. एम. देसरडा यांचे मत

बीड- सबंध महाराष्ट्राचे चित्र अस्वस्थ करणारे आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून 'वॉटर ग्रीड' योजना मराठवाड्यात व महाराष्ट्रात हे सरकार राहू इच्छित आहे. मात्र कोरड्या नद्या एक दुसऱ्याला जोडून या महाराष्ट्राच्या व मराठवाड्याच्या पदरात काहीच पडणार नाही. मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर 'वॉटर ग्रीड' हा पर्याय नाही. हे सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून 'वॉटर हार्वेस्टिंग नव्हे तर मनी हार्वेस्टिंग करत असल्याचा आरोप नियोजन आयोगाचे माजी सदस्य तथा जलतज्ञ एच. एम. देसरडा यांनी केला आहे.

बीड येथे रविवारी शासकीय विश्राम ग्रह ह् येथे आयोजित पत्रकार परिषदेत जलतज्ञ देसारडा पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मी 1972 पासून महाराष्ट्राच्या जल स्थितीवर अभ्यास करत आहे. राज्य व केंद्राच्या अनेक समित्यांवर मी काम केलेले आहे. महाराष्ट्राचे चित्र आज घडीला अस्वस्थ करणारे आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात त्या बोलण्याला कुठलाच आधार नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून जलयुक्त शिवार योजना राबवली त्या योजनेचे आज काय झाले याचा आढावा घेतला तर परिस्थिती गंभीर आहे. जलयुक्त शिवार योजनेत भाजप सरकारला व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आलेले आहे. असे सांगत देसारडा पुढे म्हणाले की, जर जल्युक्त शिवाय ही योजना यशस्वी झाली असे या सत्तेवर असलेल्या सरकारला वाटते, तर मग फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यात 14,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या का? केल्या यामध्ये केवळ मराठवाड्यात पाच हजार शेतकऱ्यांनी नापिकी यातून आत्महत्या केलेल्या आहेत. या सगळ्या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

हे तर सुलतानी संकट आहे-

महाराष्ट्रातील ग्रामीण भाग बकाल होत चालले आहेत तर शहरे बेबंद होत आहेत. याचा प्रत्यय कोल्हापूर व सांगली येथे आलेल्या जलप्रलयानंतर संपूर्ण देशाने पाहिला आहे. कोल्हापूर व सांगली येथील जलसंकट हे आसमानी नसून सुलतानी आहे. असा आरोप देखील यावेळी देसरडा यांनी केला. भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे कोल्हापूर, सांगलीतील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे देसरडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.