ETV Bharat / state

'शिपाई चालेल पण, शेतकरी नवरा नको ग बाई' उपवर मुली व पालकांची भावना - maharashtra

पालक आणि मुली यांचे विवाह बद्दलचे मत हादरवून सोडणारे आहे. शिपाई असला तरी चालेल मात्र शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको, अशी भावना मुलीची आणि मुलीच्या पालकांची देखील आहे

शेतकरी नवरा नको ग बाई!
author img

By

Published : Mar 29, 2019, 12:28 PM IST

बीड - बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांची शेती आर्थिक दृष्ट्या धोक्यात चालली आहे. याचा फटका शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला बसत आहे. हल्ली शेतकऱ्यांच्या कुटुंबात लग्नाला आलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर संजय तांदळे म्हणाले की, गेली अनेक वर्ष मी बीड जिल्ह्यात विवाह नोंदणीचे काम करत आहे.

ग्रामीण भागात नोंदणी करून घेऊन लग्न करून देण्यापर्यंतची जबाबदारी संत भगवान बाबा वाहन नोंदणी मंडळाच्यावतीने केलेली आहे. यादरम्यान आलेले अनुभव विदारक आहे. पालक आणि मुली यांचे विवाह बद्दलचे मत हादरवून सोडणारे आहे. शिपाई असला तरी चालेल मात्र शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको, अशी भावना मुलीची आणि मुलीच्या पालकांची देखील आहे.

शेतकरी नवरा नको ग बाई!

या सगळ्या परिस्थितीचा गंभीर परिणाम समाजव्यवस्थेवर होत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. लवकर लग्न होत नसल्यामुळे तरुण व्यसनाकडे वळत असल्याचे चित्र आम्ही आमच्या डोळ्याने बीड जिल्ह्यात पाहत असल्याचे डॉक्टर संजय तांदळे म्हणाले. शासकीय नोकरीत असलेलाच मुलगा नवरा म्हणून पाहिजे असे वाटणाऱ्या मुलींशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी याबद्दल माहिती दिली.

Intro:खालील बातमी तेलगू डेस्कसाठी बीड वरून सेंड करत आहे... बातमी बरोबर डॉक्टर संजय तांदळे व एका शेतकरी कुटुंबातील मुलीचा बाईट सेंड करत आहे...
********************

शेतकरी नवरा नको ग बाई ही स्थिती समाजव्यवस्थेसाठी घातक

बीड- घराघरात आहेत लग्नाळू... अनेकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग.... पण पोरगी द्यायची कोणी..... शेतकऱ्यांच्या घरात पोरगी द्यायला मुळात मुलीचा बापच तयार नाही.. महाराष्ट्राच्या गावागावात आज हेच चित्र पाहायला मिळतंय. हुंडा तर दूर मुळात शेतकऱ्याच्या पोराला मुलगी द्यायची तर कशाच्या जीवावर हा प्रश्न वधुपिते व मुली विचारत आहेत. पोरगं पदवीधर असो नाही तर आणखी कोणी शेतीच्या जीवावर संसार चालवणे अवघड असल्याचं पालकांचं मत आहे. शिपाई परवडला पण शेतकरी नको ग बाई ! अशा विचित्र मानसिकतेत शेतकऱ्यांची लेकरं लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न न होण्याचे प्रमाण 80 टक्के असल्याचे मत भगवान बाबा विवाह संस्था मंडळाच्या मंडळाचे प्रमुख डॉक्टर संजय तांदळे यांनी सांगितले.

Body:बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांची शेती आर्थिक दृष्ट्या धोक्यात चालली आहे. याचा फटका शेतकऱ्यांच्या नव्या पिढीला बसत आहे. हल्ली शेतकऱ्यांच्या कुटुंबात लग्नाला आलेल्या मुलांची संख्या वाढली आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर संजय तांदळे म्हणाले की, गेली अनेक वर्ष मी बीड जिल्ह्यात विवाह नोंदणीचे काम करत आहे. ग्रामीण भागात नोंदणी करून घेऊन लग्न करून देण्यापर्यंतची जबाबदारी संत भगवान बाबा वाहन नोंदणी मंडळाच्या वतीने केलेली आहे. यादरम्यान आलेले अनुभव विदारक आहे. पालक व मुली यांचे विवाह बद्दलचे मत हादरवून सोडणारे आहे. शिपाई असला तरी चालेल मात्र शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको, अशी भावना दस्तुरखुद्द मुलीची व मुलीच्या पालकांची देखील आहे.

Conclusion:या सगळ्या गम परिस्थितीचा गंभीर परिणाम समाजव्यवस्थेवर होत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. लवकर लग्न होत नसल्यामुळे तरुण व्यसनाकडे वळत असल्याचे चित्र आम्ही आमच्या डोळ्याने बीड जिल्ह्यात पहात असल्याचे डॉक्टर संजय तांदळे म्हणाले.
शासकीय नोकरीत असलेलाच मुलगा नवरा म्हणून पाहिजे से ववाटणाऱ्या मुलींशी ईटीव्ही भारत ने संवाद साधला . त्या यावेळी म्हणाल्या की, आम्ही आमच्या वडिलांचे शेतीत होणारे हाल डोळ्याने पाहिले आहेत. वर्षानुवर्ष पडणारा दुष्काळ कृषी मालाला मिळणारा भाव यामुळे आमच्या आई-वडिलांना दारिद्र्यात जीवन जगावे लागले. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला पाहिला आहे. एवढेच नाही तर त्याचे चटके आम्हाला देखील बसलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्हाला असं वाटतं की नोकरदार नवरा असेल तर चांगलं जीवन जगता येऊ शकते अशी भावना आमची झाली असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर मुलींनी सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.