ETV Bharat / state

लॉकडाऊनच्या कालावधीत कापूस खरेदीला परवानगी, केवळ 'इतक्या' वाहनांनाच परवानगी - बीड

लॉकडाऊनच्या कालावधीत कापूस खरेदी करण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे. यासाठी त्यांनी काही नियमावलीही सांगतली आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार
author img

By

Published : Apr 30, 2020, 12:52 PM IST

बीड - शासकीय कापूस खरेदीचा अतिरीक्त ताण कमी करुन नोंदणी केलेल्या व नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांचे कापसाची मोजमाप होऊन खरेदी होण्यासाठी एका दिवशी बाजार समितीच्या क्षमतेप्रमाणे तसेच जिनींग प्रेसिंगचे क्षेत्र विचारात घेवून कोरोना विषाणुचे संक्रमण टाळण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर पाळून एका दिवसांत ५० वाहनांना परवानगी देण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील कापूस खरेदी संदर्भात जिल्ह्यातील प्राथमिक नोंदणी केलेल्या व नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या व बीड जिल्ह्यात एफएक्यू दर्जाचा आणि एफएक्यू दर्जापेक्षा खालच्या दर्जाच्या कापसाचे उत्पादन झाले होते. हे पहाता जिल्ह्यातील सर्व सीबीआय महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांना कापूस खरेदीसाठी वेळ वाढवून देणे. एका दिवसात 20 पेक्षा जास्त वाहनांना परवानगी देणे व जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री चालक यांनी शेतकऱ्यांकडील एफएक्यू व नाॅन एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदीस परवानगी देण्याची आवश्यकता होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 20 एप्रिलच्या आदेशानुसार मानक कार्यप्रणाली (एसओपी)चे पालन करण्याच्या अटीवर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ म. व कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया यांच्याव्दारे खरेदी केल्या जाणाऱ्या केंद्रावर दि. 13 मार्चपर्यंत बाजार समितीकडे प्राथमिक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत 25 वाहने व दुपारी 2 ते सायंकाळी साडेपाच यावेळेत 25 वाहने कापूस खरेदीस परवानगी देण्यात येत आहे.

या अटींवर कापूस खरेदी केंद्रावर किंवा कोणत्याही जिनींग फॅक्ट्रीमधे ज्या दिवशी शासकीय ग्रेडर उपलब्ध नाहीत तेथे प्राथमिक नोंदणी केलेल्या व प्राथमिक नोंदणी न केलेल्या एफएक्यू व नाॅन एफएक्यू (FAQ व NON FAQ) दर्जाच्या कापसाची खरेदी करण्यास जिनींग प्रेसिंग फॅक्ट्री चालकांना नेमुण दिलेल्या वेळेत व निर्देशानूसार कापूस खरेदीस परवानगी दिली आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अटी शर्तीस अधीन राहून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघ, मुंबई कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडिया व खासगी जिनींग प्रेसींग फॅक्ट्री चालकांना कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. संबंधित खरेदी केंद्रावर शासकीय खरेदी असो किंवा नसो त्या केंद्रावर जिनींग, प्रेसिंग फॅक्ट्री चालक, खासगी खरेदीदार यांना शेतकऱ्यांकडील कापूस खरेदीस परवानगी दिल्याने शेतकऱ्याचा कापसाचे मोजमाप होवून शेतकऱ्याची त्यांना कापसाचा नगदी मोबदला मिळेल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - "त्या दोन महिन्यात जे शिकलो ते आयुष्यभरात शिकलो नसतो", कोटा येथून परतलेल्या विद्यार्थ्याची आपबिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.