ETV Bharat / state

बीडमधील मंजूर चारा छावण्यांपैकी ४६२ छावण्या अद्याप बंद, मान्यता रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - चारा

चारा छावणीच्या मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक चारा छावणी चालकांनी चकरा मारल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी छावणीला मंजुरी देखील दिली. मात्र, मंजुरी मिळून सात दिवसांहून अधिक काळ लोटला, तरी देखील बहुतांश चारा छावण्या सुरूच झाल्या नाहीत.

चारा छावणी (प्रातिनिधीक छायाचित्र)
author img

By

Published : Mar 25, 2019, 1:31 PM IST

बीड - दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बीड जिल्ह्यात निर्माण होत आहे. यासाठी अनेक जणांनी चारा छावण्यांचे प्रस्ताव शासनाकडे दिले होते. त्यानुसार ७८२ छावण्या मंजूर झाल्या होत्या. पण, त्यातील केवळ ३२० छावण्या सुरू झाल्या आहेत. मान्यता मिळूनही ४६२ छावण्या अद्याप बंद आहेत. तेव्हा या छावण्या सुरू न केल्यास त्यांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी दिला आहे.

चारा छावण्यांना मान्यता मिळून सात दिवस उलटले तरी बहुतांश छावण्या सुरु झाल्या नाहीत.

चारा छावणीच्या मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक चारा छावणी चालकांनी चकरा मारल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी छावणीला मंजुरी देखील दिली. मात्र, मंजुरी मिळून सात दिवसांहून अधिक काळ लोटला, तरी देखील बहुतांश चारा छावण्या सुरूच झाल्या नाहीत. हे वास्तव चित्र बीड जिल्ह्यात आहे. ७८२ पैकी केवळ ३२० चारा छावण्या सुरू झाल्या असून, उर्वरित ४६२ चारा छावण्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. दुष्काळाचे प्रचंड दुर्भिक्ष असल्याने जनावरांना चारा मिळावा हा उद्देश छावण्यांचा असतो. पण, त्याच सुरू न झाल्यास या उद्देशालाच हरताळ फासला जाईल.

बीड जिल्ह्यात साडेसात ते आठ लाख जनावरांची संख्या आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांची संख्या लक्षात घेता, सर्व छावण्या वेळेत सुरू होणे जिल्हा प्रशासनाला अपेक्षित होते. मात्र, अर्ध्यापेक्षाही कमी चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. मंजुरीची गरबड करणाऱ्या छावणीत चारा छावणी चालकांनी मंजुरी मिळाल्यानंतर सात दिवसात चारा छावणी सुरु करणे अपेक्षित आहे. मात्र, अद्यापही सुरू न झालेल्या चारा छावण्यांना शेवटची नोटीस बजावून सुरू करण्याबाबत सांगण्यात येईल. तरीदेखील ज्या चारा छावण्या बंद राहतील त्यांची मान्यता रद्द केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी पांडे यांनी दिली.

Intro:782 पैकी 462 चारा छावण्या अद्यापही सुरू नाहीत; शेवटची नोटीस देऊन बंद चारा छावण्यांची मान्यता होणार रद्द

बीड- जिल्ह्यात दुष्काळाचे दुर्भिक्ष प्रचंड असल्याने मोठ्या प्रमाणात आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे असे, म्हणतात अनेकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चारा छावण्यांचे प्रस्ताव दिले. मंजूर चारा छावण्या 782 पैकी केवळ 320 सुरू आहेत. उर्वरित 462 चारा छावण्या मात्र अद्यापही सुरू झालेल्या नाहीत येत्या चार दिवसात बंद चारा छावणी चालकांना नोटीस देऊन सुरू करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणार आहेत. नोटीस देऊनही सुरू न होणाऱ्या चारा छावण्यांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी दिली.

Body:चारा छावणी च्या मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अनेक चारा छावणी चालकांनी चकरा मारल्य. बीड जिल्हाधिकाऱ्यांनी छावणीला मंजुरी देखील दिली. मात्र मंजुरी मिळून सात दिवसाहून अधिक काळ लोटला तरी देखील बीड जिल्ह्यातील बहुतांश चारा छावण्या सुरूच झाल्या नाहीत. हे वास्तव चित्र बीड जिल्ह्यात आहे. 782 पैकी केवळ 320 चारा छावण्या सुरू झाल्या. असून उर्वरित 462 चारा छावण्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. दुष्काळाचे प्रचंड दुर्भिक्ष असल्याने जनावरांना चारा मिळावा या उद्देशाने सुरू झालेल्या चारा छावण्या बंद आहेत.

Conclusion:बीड जिल्ह्यात साडेसात ते आठ लाख जनावरांची संख्या आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांची संख्या लक्षात घेता सर्व छावण्या वेळेत सुरू होणे जिल्हा प्रशासनाला अपेक्षित होते मात्र अर्ध्यापेक्षाही कमी चारा छावण्या सुरू झालेल्या आहेत मंजुरीची गरबड करणाऱ्या छावणीत चारा छावणी चालकांनी मंजुरी मिळाल्यानंतर सात दिवसात चारा छावणी सुरु करणे अपेक्षित आहे मात्र अद्यापही सुरू न झालेल्या चारा छावण्यांना शेवटची नोटीस बजावून सुरू करण्याबाबत सांगण्यात यात येईल. तरीदेखील ज्या चारा छावण्या बंद राहतील त्यांची मान्यता रद्द केली जाईल. अशी माहिती जिल्हाधिकारी पांडे यांनी दिली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.