बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ गड येथे सोमवारी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी परळी तालुक्यातील चारा छावणीला भेट देऊन पशु मालकांना धीर दिला.
फडणवीस यावेळी म्हणाले, की महाराष्ट्रात गंभीर दुष्काळ निर्माण झालेला आहे. अशा बिकट परिस्थितीत आपण पशुधन जगविण्यासाठी मोठ्या नेटाने प्रयत्न करत आहोत. या पुढच्या काळात महाराष्ट्र शासन दुष्काळ निवारणासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबर असेल, असे आश्वासन फडणवीस यांनी चारा छावणी वरील उपस्थित पशुपालकांना मुख्यमंत्री देवेंद्र दिला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत शासनाच्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्र्यांनी यावेळी छावणी चालक फुलचंद कराड यांचे कौतुक केले. यावेळी बीडच्या पालक मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.