ETV Bharat / state

पाटोदा तालुक्यातील घोलप-हनुमान वस्ती रस्त्याची दुरावस्था, नागरिकांचे चिखलात बसून आंदोलन - gholap settlement people protest for road

अनेकदा बोंबाबोंब केल्यानंतर नगरपंचायत दरवर्षी किरकोळ मुरूम वगैरे टाकून तात्पुरते काम करते. मात्र, पक्के काम नसल्याने रस्त्याची पुन्हा दुरावस्था होते. त्यामुळे, नगरपंचायतीच्या कार्याला संतापून आज घोलप वस्ती येथील काही संतापलेल्या नागरिकांनी चक्क चिखलात बसून आंदोलन केले आहे.

आंदोलन करताना नागरिक
आंदोलन करताना नागरिक
author img

By

Published : Sep 3, 2020, 6:11 PM IST

बीड- जिल्ह्यातील पाटोदा नगरपंचायत हद्दीतील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून थातूर-मातूर कामे करण्यात आली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षपाणाला कंटाळून ग्रामस्थांनी स्वतः चिखलात बसून आज आंदोलन केले. आता तरी प्रशासन सामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देईल का? असा प्रश्न या आंदोलकांनी उपस्थित केला आहे.

आंदोलन करताना नागरिक

पाटोदा तालुक्यातील घोलप वस्ती ते हनुमान वस्ती या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना या खराब रस्त्यावर ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सखल भागात पाण्याची डबकी साचली आहेत. शाळेकरी मुले, वयोवृद्ध माणसे तसेच गरोदर माता भगिनी यांना या खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

अनेकदा बोंबाबोंब केल्यानंतर नगरपंचायत दरवर्षी किरकोळ मुरूम वगैरे टाकून तात्पुरते काम करते. मात्र, पक्के काम नसल्याने रस्त्याची पुन्हा दुरावस्था होते. त्यामुळे, नगरपंचायतीच्या कार्याला संतापून आज घोलप वस्ती येथील काही नागरिकांनी चक्क चिखलात बसून आंदोलन केले. दरम्यान याप्रकरणी ८ दिवसा अगोदर निवेदन देखील देण्यात आले आहे. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही, परिणामी नागरिकांनी आंदोलनाचा हा पावित्रा घेतला.

हेही वाचा- ...तर बीड जिल्ह्यात नोव्हेंबरमध्ये कोरोना परिस्थिती बिकट असेल- आयुक्त सुनील केंद्रेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.