ETV Bharat / state

Gram Panchayat Elections : तब्बल वीस वर्षानंतर गावातील नागरिक बजावणार मतदानाचा हक्क...!

बीड जिल्ह्यातील सौंदाना ( Saundana Village in Beed District ) गावात तब्बल वीस वर्षानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत (Gram Panchayat Elections ) नागरिक मतदान करणार ( Saundana Village Gram Panchayat Election ) आहेत.

author img

By

Published : Dec 14, 2022, 4:20 PM IST

: तब्बल वीस वर्षानंतर गावातील नागरिक बजावणार मतदानाचा हक्क...!

बीड - जिल्ह्यात एकूण 704 ग्रामपंचायतची रणधुमाळी चालू (Gram Panchayat Elections ) आहे. याच रणधुमाळीमध्ये बीड शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सौंदाना या गावातील ( Saundana Village in Beed District ) तब्बल वीस वर्षानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत लोक मतदान करणार ( Saundana Village Gram Panchayat Election ) आहेत. गेली 20 वर्ष मात्र या गावची ग्रामपंचायत ही बिनविरोध होती. मात्र सत्याधारांनी गावचा विकास कशा पद्धतीने केला आहे? काय आहेत या गावच्या समस्या हे आपण जाणून घेऊया...

गाव जिल्ह्याच्या नकाशावर - सौंदाना या गावची ग्रामपंचायत गेली वीस वर्ष बिनविरोध होत होती. आमची जी वरिष्ठ मंडळी आहे, त्यांनी प्रयत्न केले की यावेळेसही ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी. गावामध्ये इलेक्शन नको मतदान नको आपआपसात मतभेद होतात, मनभेद होतात, खर्च मोठ्या प्रमाणात होतो. काही लोक असे असतात की विघ्न संतोषी त्यांना हे नको आहे. लोकांनी ही निवडणूक गावावर लादली आहे, त्यांच्या इच्छे खातर आम्ही सर्वजण निवडणुकीला सामोरे जात आहोत. ही बिनविरोधची परंपरा कायम ठेवायची आमच्या वरिष्ठ मंडळीची इच्छा होती. तर ती राहिली नाही परंतु मैदानात जर उतरलं तर, आम्हालाही उतरावच लागेल. गाव जिल्ह्याच्या नकाशावर एक प्रमुख गाव म्हणून आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे असल्याची इच्छा गावकऱ्यांनी केली.

वीस वर्षानंतर पहिल्यांदाच गावात मतदान - गेल्या वीस वर्षानंतर मी पहिल्यांदाच गावात मतदान करणार आहे अशी प्रतिक्रिया शिवराज बांगर यांनी दिली आहे. कारण या अगोदर आमची ग्रामपंचायत बिनविरोध होती, सर्व तरुण मंडळी आम्ही पुढे घातले आहे आणि यांनी आम्हाला एक शब्द दिला आहे की गावाच्या विकासासाठी ज्या शासनाकडून सुविधा येतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू, या शब्दाला धरून आम्ही त्यांनाही सर्वानुमते उमेदवारी जाहीर केली आहे.

गायके बाळासाहेब - गेल्या 20 वर्षापासून ग्रामपंचायत इलेक्शन किंवा मतदान काय असतं हे लोकांना माहीत नाही, गेल्या वीस वर्षापासून आमच्या गावात मतदानाचा हक्क मीही पहिल्यांदाच बजावत आहे, गावातील लोकांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीची कुठेही कमी भासू न देता, शासनाच्या ज्या योजना असतील त्या गोरगरिबापर्यंत पोहोचण्याचा काम आम्ही करू.

गायके सिध्देश्वर - अपेक्षा आहे की आमच्या गावातील स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी बीडला जाऊन अभ्यास करत होते, गावामध्ये अभ्यासिका असावी त्याचबरोबर गावात खेळण्यासाठी क्रीडांगण असावं, जिल्हा परिषद शाळेमध्ये खेळाचे साहित्य पाहिजे त्याचबरोबर गावात वाचनालय पाहिजे, शासनाकडून गोष्टी सर्वसामान्य पुरवल्या जातात त्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचाव्यात, आमचे जी शिवराज बांगर आहेत ते नक्कीच आमच्या विकासाची योजना खेचून आणतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.