ETV Bharat / state

Citizens Boycotted Voting : धोंडराईच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, सुविधा नाही तर मतदान नाही - मतदानावर बहिष्कार

बीडच्या गेवराई तालुक्यात असलेल्या धोंडराई या गावातील नागरिकांनी सुविधा नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला (Citizens Boycotted Voting) आहे. एकीकडे दलित वस्ती अंतर्गत लाखो रुपयांची उधळपट्टी पंचायत समिती प्रशासनाकडून केली (boycotted voting at Dhondarai in beed) जाते.

Citizens Boycotted Voting
धोंडराईच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
author img

By

Published : Dec 1, 2022, 1:48 PM IST

बीड : बीडच्या गेवराई तालुक्यात असलेल्या धोंडराई या गावातील नागरिकांनी सुविधा नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकला (Citizens Boycotted Voting) आहे. एकीकडे दलित वस्ती अंतर्गत लाखो रुपयांची उधळपट्टी पंचायत समिती प्रशासनाकडून केली (boycotted voting at Dhondarai in beed) जाते. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या सुविधा मात्र पुरवल्या जात नसल्याचे ज्वलंत उदाहरण सध्या समोर आले आहे. या झोपडपट्टी राहणाऱ्या लोकांचे 300 च्या आसपास मतदान आहे. हे लोक स्वखर्चातून आपल्या येण्या-जाण्यासाठी रस्ता करतात, मात्र ग्रामपंचायत कार्यालयाकडे कसलेच लक्ष देत नसल्याचे ते यावेळी सांगत आहेत.

निवडणुकीवर बहिष्कार : एकिकडे ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून अनेक भावींनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. तर नामनिर्देशन पत्र भरण्याची तयारीही जोरात सुरू आहे, असे असतानाच धोंडराई गावाजवळ असलेल्या झोपडपट्टी येथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. धोंडराईच्या झोपडपट्टी भागात अनेक कुटुंब गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र झोपडपट्टी भागात कोणत्याही मुलभुत सुविधा मिळत नसल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले (Citizens boycotted voting at Dhondarai) आहे.

धोंडराईच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार प्रतिक्रिया देताना नायब तहसीलदार

हक्क बजावण्याचे आवाहन : झोपडपट्टी येथे मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे सांगत तेथील नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या भागात पिण्याचे पाणी, रस्ते, नाल्या, पुरेशी वीज यांसारख्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे आम्ही होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र धोंडराई येथील झोपडपट्टी भागातील नागरिकांनी तहसीलदार यांना दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या भागात कोणतेही विकास कामे झालेली नाहीत, मग मतदान करायचेच कशाला असा संतप्त प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. झोपडपट्टी येथे राहणारे सर्वच लोक मजुर आहेत. त्यांना फक्त मतदाना पुरतेच विचारात घेतले जात आहे, असे दिसुन येत आहे. तर निवेदन प्राप्त होताच तहसील प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली असून लवकरच प्रशासकीय अधिकारी संबंधित ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. तर मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपला हक्क बजावण्याचे आवाहन तहसील प्रशासनाकडून करण्यात आले (Boycotted Voting) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.