ETV Bharat / state

Beed Crime : धक्कादायक! बीडच्या परळीमध्ये बालविवाह; नवरदेव, मंडपवाला, आचाऱ्यासह 200 जणांवर गुन्हा - 200 जणांवर गुन्हा दाखल

बीडच्या परळी तालुक्यात बालविवाह लावल्याप्रकरणी 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा बालविवाह होण्यापूर्वीच चाईल्ड लाईनला माहिती मिळाली होती. यावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

Beed Crime
बालविवाह प्रकरण
author img

By

Published : Mar 13, 2023, 10:10 PM IST

बीड : जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातून बालविवाहचे प्रकरण समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नंदागौळ येथे आज सकाळी बालविवाह होणार होता. याची माहिती चाईल्डला मिळाली होती. परंतु पथक पोहोचण्याअगोदरच लग्न लावण्यात आले होते. त्यानंतर ग्रामसेवकासह पोलिसांनी सर्व पंचनामा करून नवरदेव दोन्ही कडील नातेवाईक फोटोग्राफर, मंडपवाला, भटजीसह जवळपास 200 नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या लग्नानंतर गावातील सर्वच लोक पळून गेले.

नातेवाईक घटनास्थळावरून फरार : परळी तालुक्यातील नंदागौळ येथील आदिनाथ गोविंद गीते (वय 24) याचा विवाह आंबेजोगाई तालुक्यातील चोपनवाडी येथील 16 वर्षीय मुलीसोबत रविवारी 11 वाजता नियोजित होता. दरम्यान, ही माहिती चाईल्ड लाईनला 1098 क्रमांकावर मिळाली होती. चाईल्ड लाईनचे संतोष रेपे यांनी ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे यांना माहिती दिली. या सर्वांनी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास भेट दिली असता त्या ठिकाणी लग्नाचे सर्व साहित्य आढळून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. दरम्यान, या अगोदरच लग्न लावून वधू वरासह सर्व नातेवाईक घटनास्थळावरून पसार झाले होते.

तब्बल 200 जणांवर गुन्हा दाखल : पोलिसांना घटनास्थळी कुणाही न मिळाल्यामुळे अखेर ग्रामसेवक ज्ञानेश्वर मुकाडे यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तब्बल 200 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेव व नवरीचे आई-वडील, मामा, मंडपवाला, फोटोग्राफर, आचारी यांच्यासह जवळपास 200 वराडी मंडळी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक गणेश झांबरे करत आहेत.

काय आहे चाईल्ड लाईन : केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा चाईल्ड लाईन हा उपक्रम आहे. बदलत्या काळात चाईल्ड लाईन ही काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 19 वयोगटातील मुला-मुलींकरिता 24 तास कार्यरत असणारी मोफत सेवा आहे. चाईल्ड लाईन अंतर्गत व्यसनमुक्ती, बालमजुरी, बालविवाह, बाल भिक्षेकरी, लैंगिक शोषण अशा अनेक क्षेत्रांमध्ये 0 ते 18 वर्षांखालील मुलामुलींच्या मदतीसाठी कार्य केले जात असते. चाईल्ड लाईनची मदत हवी असल्यास 1098 हा टोल फ्री क्रमांक डायल करावा.

हेही वाचा : Mumbai Fire News : मालाडमधील झोपडपट्टीला भीषण आग; 20 सिलिंडरचा ब्लास्ट, एकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.