परळी-वैजनाथ (बीड) - धमकी देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय पिडीत विवाहितेच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुरुवातीला गुंगीचे औषध देऊन शारिरीक संबंध प्रस्थापित केले व नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दोन वर्षांपासून शारीरिक अत्याचार केल्याचा नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार पीडित महिला व आरोपी हे नात्याने मेव्हणा-मेव्हणी आहेत. दोन वर्षांपूर्वी आरोपी तक्रारदार पीडित महिला घरी एकटी असताना आला. फ्रुट ज्युसमध्ये गुंगीचे औषध देऊन या महिलेला बेशुद्ध केले. विवस्त्र अवस्थेत शारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याचा व्हिडिओ व छायाचित्रे काढली. त्यानंतर हे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक अत्याचार केले. अशी तक्रार दिल्यावरुन आरोपी राहुल सुधाकर गुत्तेदार (रा. सोन्वत, ता.कमलापूर, जि.गुलबर्गा (कलबुर्गी) , राज्य कर्नाटक) याच्याविरोधात भा.दं.वि.चे कलम 376, 366, 504 यांसह विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मेंढके हे करीत आहेत.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मेव्हणीवर वारंवार बलात्कार; गुन्हा दाखल - beed district news
ज्युसमधून गुंगीचे औषध पाजून बलात्कार करुन त्याचे व्हिडिओ व फोटो काढले. त्यानंतर मेव्हणीला ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सतत बलात्कार केल्याप्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.