ETV Bharat / state

महिला भूमापकाच्या कामात भूमाफियांचा अडथळा; भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी टाकल्या नांग्या - भू माफिया

बीडमध्ये भूमाफियांची दादागिरी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेवराईतील शनीमंदिर संस्थानाच्या जमिनीची मोजणी करण्याऱ्या महिला अधिकाऱ्यास मोजणीच्या कामाला विरोध केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नाहीतर या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही. महिला पालकमंत्री असूनही महिला अधिकाऱ्यांना काम करताना अडचणी निर्माण होत आहेत, हे विशेष

एस. एम. कांगरे (भूमापक अधिकारी)
author img

By

Published : May 17, 2019, 7:39 PM IST

बीड - जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामध्ये महिला अधिकार्‍यांना शासकीय कामापासून रोखण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. बीड येथील शनी मंदिर संस्थानच्या कोल्हेर (ता. गेवराई) येथील ३० एकर जागा मोजण्यापासून शुक्रवारी एका महिला भूमापक अधिकाऱ्याला रोखल्याची घटना घडली आहे. भूमिअभिलेखच्या उपअधीक्षक यांचे आदेश असतानाही या जागेची मोजणी करण्यास एकाने मज्जाव केला. मात्र, या प्रकरणी संबधित मोजणी अधिकारी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करायला तयार नाहीत. एस. एम. कांगरे असे त्या महिला भूमापक अधिकाऱ्याचे नाव आहे. तर गेवराई येथील अनुपमा टल असे मोजणीस विरोध करणाऱ्याचे नाव आहे.

एस. एम. कांगरे (भूमापक अधिकारी)

बीड जिल्ह्यात विविध देवस्थानच्या मोठ्या प्रमाणात जमिनी असून अनेक भूमाफिया या जमिनी बळकावू पाहात आहेत. बीड येथील शनी मंदिर संस्थानची तीस एकर जमीन कोल्हेर तालुका गेवराई येथे आहे. या जमिनीची मोजणी करून हद्द खुणा कायम करण्यासाठी शनी मंदिर संस्थानने तातडीच्या मोजणीसाठी शुल्क भरले होते. त्यानुसार शुक्रवारी संबंधित जागेची मोजणी होणार होती. त्यासाठी भूमापक अधिकारी एस.एम. कांगरे या आपल्या सहकाऱ्यांसह मोजणीस्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यावेळी अनुपम राधेशाम अट्टल याने संबंधित महिला अधिकारी यांना मोजणी करण्यास विरोध करत मोजणीच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

देवस्थानच्या जागा इतर कोणाच्याही मालकीच्या असू शकत नाहीत, असे शासनाने स्पष्ट केलेले असतानाही जागेची मोजणी करण्यास एका महिला अधिकाऱ्याला रोखण्याचा प्रकार भूमाफियांकडून केला जात आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री महिला असतानादेखील भुमिअभिलेखचे वरिष्ठ अधिकारी मात्र आपल्या विभागाच्या महिला कर्मचार्‍यांना सहकार्य करण्याऐवजी भूमाफियांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार दिसून आला. तसेच या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

Intro:महिला भूमापकाला मोजणी पासून अडविले; भुमिअभिलेख अधिकाऱ्यांनी टाकल्या नांग्या

बीड- जिल्ह्यात गुन्हेगारीची प्रति मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महीला अधिकार्‍यांना शासकीय कामापासून रोखण्याचे प्रकार जिल्ह्यात सातत्याने घडत आहेत. बीड येथील शनी मंदिर संस्थानच्या कोल्हेर (ता. गेवराई) येथील 30 एकर जागा मोजण्या पासून शुक्रवारी एका महिला भूमापक अधिकाऱ्याला रोखले आहे. भुमिअभिलेख च्या उपअधीक्षक यांचे आदेश असतानाही सदर जागेची मोजणी होऊ शकली नाही. एका महिला अधिकाऱ्याला मोजणी पासून रोखल्यानंतरही भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल करायला तयार नाहीत. एस. एम. कांगरे असे त्या महिला भूमापक अधिकारी यांचे नाव आहे.

Body:या प्रकरणात गेवराई येथील अनुपमा टल याने मोजणी करण्यासाठी रोखले असल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे. बीड जिल्ह्यात विविध देवस्थानच्या मोठ्या प्रमाणात जमिनी असून अनेक भूमाफिया या जमिनी बळकावू पहात आहेत. बीड येथील शनि मंदिर संस्थानची तीस एकर जमीन कोल्हेर तालुका गेवराई येथे आहे. या जमिनीची मोजणी करून हद्द खुणा कायम करण्यासाठी शनी मंदिर संस्थानने तातडीच्या मोजणीसाठी शुल्क भरले होते. त्यानुसार शुक्रवारी सदर जागेची मोजणी होणार होती. मात्र याठिकाणी मोजणीसाठी भूमापक श्रीमती कांगरे या आपल्या सहकाऱ्यांसह गेल्या होत्या. त्यावेळी अनुपम राधेशाम अट्टल याने संबंधित महिला अधिकारी यांना आडवत मोजणी करण्यापासून रोखले आणि मोजणीच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

Conclusion:देवस्थानच्या जागा इतर कोणाच्याही मालकीच्या असू शकत नाहीत. असे शासनाने स्पष्ट केलेले असतानाही जागेची मोजणी पासून एका महिला अधिकाऱ्याला रोखण्याचा प्रकार भूमाफिया करत आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री महिला असताना देखील भुमिअभिलेखचे वरिष्ठ अधिकारी मात्र आपल्या कर्मचार्‍यांना सहकार्य करण्याऐवजी भूमाफियांना पाठीशी घालत आहेत. एका महिला अधिकाऱ्याला अडवण्यात आल्यानंतर देखील या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.