ETV Bharat / state

Buffalo gift : अजबच! मित्राच्या वाढदिवसाला मित्रांनी केला चक्क रेडा गिफ्ट - मित्राच्या वाढदिवसाला मित्रांनी केला रेडा गिफ्ट

बीडमध्ये अजबच प्रकार समोर आला आहे. मित्राच्या वाढदिवसानिमित्त चक्क रेडा भेट दिल्याचा ( Buffalo gift by friends in Beed ) अनोखी बाब बीडमध्ये घडली. 10 मित्रांनी मिळून उंची 6 फूट तर 7 फूट लांबीचा रेडा भेट दिला आहे. या रेड्याच्या अंगावर वाघाची डिजाईन केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 12, 2022, 11:07 PM IST

मित्राच्या वाढदिवसाला मित्रांनी केला चक्क रेडा गिफ्ट

बीड: लहरी मित्रांचा हा अनोखा अंदाज बीडमध्ये पाहायला मिळाला. बीडचे भाजप नगरसेवक जगदीश गुरखुदे यांचे लहाने बंधु सामाजिक कार्यकर्ते परशुराम गुरखुदे यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मित्राच्या संकटात धावून जाणारे परशुराम गुरखुदे हे अनेक तरुणांच्या गळ्यातले ताईत आहेत. आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र कंपनीने त्यांच्यासाठी चक्क एक रेडा भेट ( Buffalo gift by friends in Beed ) म्हणून दिला आहे. या रेड्याला पाहूनच भल्या भल्यांना घाम फुटेल. या रेड्याची उंची 6 फूट तर लांबी 7 फूट आहे. असा डौलदार रेडा आणि त्याच्या अंगावर वाघाची डिजाईन केली आहे.

वाढदिवसानिमित्त रेडा भेट: हा रेडा ज्यावेळेस बीडच्या माळीवेस भागात वाजत गाजत आला त्यावेळेस नागरिक त्याकडे पाहतच राहिले. काही क्षणासाठी गर्दीतून पाहिल्यानंतर वाघच आला की काय ? असा भास नागरिकांना होऊन लागला. हेच गिफ्ट पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. परशुराम गुरखुदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या सामाजिक कार्याचे आणि उपक्रमाचं आयोजन केले जाते. मात्र, त्यांचा यंदाचा वाढदिवस हा खास ठरला आहे. दरम्यान याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे.

एक महिना रेड्याचा शोध: तर याविषयी ज्या मित्रांनी हा रेडा गिफ्ट केलाय, ते म्हणाले की आमच्या सर्व मित्राच्या संकटाच्या वेळी आमचा वाघासारखा मित्र धावून येतो. त्यामुळे या मित्राला काय गिफ्ट द्यायचं ? हा विचार आमच्या मनामध्ये होता. तब्बल एक महिना आम्ही या रेड्याचा शोध करत होतो. एक महिन्यानंतर हा रेडा आम्हाला मिळाला आहे. त्यामुळे आमच्या वाघासारख्या मित्राला गिफ्ट देताना आम्ही या रेड्याला देखील वाघासारखी रंगरंगोटी करून दिला, अशी प्रतिक्रिया परशुराम गुरखुदे यांच्या मित्र परिवारांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.