ETV Bharat / state

पैशासाठी आईचा दगडाने ठेचून केला खून, आरोपी मुलास गेवराईतून अटक - Beed murder news

पैशासाठी मुलाने स्वतःच्याच जन्मदात्या आईचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे घडली आहे. खून केल्यानंतर मुलगा घटनास्थळावरुन पसार झाला होता. पोलिसांनी त्याला गेवराईतून अटक केली आहे.

आरोपी मदन
आरोपी मदन
author img

By

Published : Aug 21, 2021, 2:57 PM IST

बीड - जमीन विकून आलेले पैसे मला का देत नाहीस, म्हणत चक्क जन्मदात्या आईलाच दगडाने ठेचून मारल्याची घटना शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) घडली असून शनिवारी (दि. 21 ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली आहे. मदन पांडुरंग मानगिरे, असे आरोपी मुलाचे नाव आहे तर प्रयागाबाई पांडुरंग मानगिरे (वय 60 वर्षे, रा. चौसाळा, ता. बीड), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेले सविस्त वृत्त असे की, काही दिवसांपूर्वी प्रयागाबाई यांनी तीन एकर जमीन विकली होती. त्याचे आलेले पैसै मला देत का नाहीस म्हणत मदन अनेक दिवसांपासून आईशी भांडत होता. अखेर शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) रात्री मदन दारु पिऊन आला व पैशासाठी भांडण काढून आईला मारू लागला. हे भांडण वाढत गेले व मदनने आईच्या डोक्यात दगड मारला. डोक्यात जोराचा घाव बसल्याने प्रयागाबाई यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली होती, मात्र मदनने ही बाब कुणाला सांगितली नाही. शनिवारी सकाळी प्रयागबाई उठल्या नसल्याने शेजारच्यांनी घरात पाहिल्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला.

गेवराईतून मदनला पोलिसांनी केली अटक

मदन मानगिरेने आपल्या आईचा खून झाल्याचे लक्षात आल्यानंतर बीड तालुक्यातील चौसाळा येथून पळ काढला. तोपर्यंत चौसळा पोलिसांना खूनाची घटना कळली होती. पोलिसांनी तपास यंत्रणा गतिशील केली व मदन मानगिरे याला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक केली. याप्रकरणी पुढील तपास चौसाळा पोलीस करत आहे.

हेही वाचा - भारत देश रेल्वेने प्रवास करून थकला, बीड जिल्हा मात्र मुकला; विद्यार्थी रेल्वे कृती समीतीचे बीडमध्ये आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.