ETV Bharat / state

बीडमध्ये बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाच्या भूमिपूजन खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 5 कोटी 45 लाख रुपये खर्चाचे हे बसस्थानक तयार होणार आहे.

बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाच्या भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण खासदार प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
author img

By

Published : Sep 20, 2019, 10:46 AM IST

Updated : Sep 20, 2019, 11:09 AM IST

बीड - राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाच्या भूमिपूजन खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 5 कोटी 45 लाख रुपये खर्चाचे हे बसस्थानक तयार होणार आहे. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कामाची उजळणी उपस्थितांसमोर केली. याचबरोबर खा. मुंडे यांनी हीन पातळीवरच्या राजकारणाला जनता वैतागली आहे, अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेतला.

हेही वाचा - बेस्ट वर्कर्स युनियन आणि कृती समितीने पुन्हा उगारले संपाचे हत्यार

वैद्यनाथ देवस्थानचा समावेश रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळाच्या यादीत केल्याबद्दल तसेच बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांचा यावेळी प्रवाशांनी सत्कार केला व आभार मानले. यावेळी आगारप्रमुख, भाजपचे पदाधिकारी, प्रवाशी आदी उपस्थित होते.

बीड - राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाच्या भूमिपूजन खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. 5 कोटी 45 लाख रुपये खर्चाचे हे बसस्थानक तयार होणार आहे. यावेळी त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या कामाची उजळणी उपस्थितांसमोर केली. याचबरोबर खा. मुंडे यांनी हीन पातळीवरच्या राजकारणाला जनता वैतागली आहे, अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेतला.

हेही वाचा - बेस्ट वर्कर्स युनियन आणि कृती समितीने पुन्हा उगारले संपाचे हत्यार

वैद्यनाथ देवस्थानचा समावेश रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळाच्या यादीत केल्याबद्दल तसेच बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांचा यावेळी प्रवाशांनी सत्कार केला व आभार मानले. यावेळी आगारप्रमुख, भाजपचे पदाधिकारी, प्रवाशी आदी उपस्थित होते.

Intro:पंकजा मुंडे यांच्यामुळेच परळी विकासाच्या मार्गावर - खा. प्रितम मुंडे


बीड- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आपला प्रत्येक क्षण या भागाचा विकास करण्यासाठी खर्च केला, सत्तेच्या माध्यमातून शहर व मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून त्यांनी परळीला ख-या अर्थाने विकासाच्या मार्गावर आणून ठेवले आहे, आता त्यांना ताकद देण्याची वेळ आली आहे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा असे आवाहन खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आज येथे केले. दरम्यान, शहरात पालिकेने जे काम करणे आवश्यक होते, ते आम्ही केलं आहे, त्यांच्या हीन पातळीवरच्या राजकारणाला जनता वैतागली आहे अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ५ कोटी ४५ लाख रुपये खर्चाच्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी त्यांच्या हस्ते भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, ना. पंकजाताई मुंडे यांनी बसस्थानकासाठी निधी मंजूर करून आणल्यामुळे लवरकच याला आधुनिक सोयी सुविधांसह नवे रूप मिळणार आहे. हा प्रश्न प्रवाशांच्या अतिशय जिव्हाळ्याचा होता तो आता मार्गी लागला आहे. ना. पंकजाताई मुंडे यांनी गेल्या पांच वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार, राष्ट्रीय महामार्ग, मुलभूत विकास याद्वारे मोठा निधी आणला.बचतगटांच्या माध्यमातून गायी वाटप, कुक्कूटपक्षी वाटप करून तसेच व्यवसायातून महिलांनी स्वावलंबी केले. सामुदायिक विवाह सोहळा, महा आरोग्य शिबीर, लाभार्थ्यांना घरपोच योजनांचा लाभ दिला. आम्ही व्होट बँकेचे राजकारण कधीच केले नाही, तसे केले असते तर एवढा विकास करू शकलो नसतो असे त्या म्हणाल्या.

*विरोधकांचे हीन राजकारण*
---------------------------------
वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाचा आराखडा असो की अंतर्गत रस्त्याची कामे ती ना. पंकजाताई मुंडे यांनी मार्गी लावली. खडका धरणाचे पाणी देखील त्यांनीच मिळवले. जे काम नगरपरिषदेने करायला पाहिजे होते, ते आम्ही केले परंतु विरोधकांनी सध्या हीन पातळीचे राजकारण सुरू केले आहे, याला जनताच पुरती कंटाळली आहे. नगरपरिषद त्यांच्या ताब्यात देऊन काय झाले? असा सवाल करत त्यांनी केलेली दुर्दशा दूर करून शहराला पुन्हा चांगले दिवस आणायचे असतील तर ना. पंकजाताई मुंडे यांना ताकद द्या असे आवाहन त्यांनी केले.

प्रवाशांनी केला सत्कार-

वैद्यनाथ देवस्थानचा समावेश रेल्वेच्या राष्ट्रीय तीर्थस्थळाच्या यादीत केल्याबद्दल तसेच बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामासाठी निधी मंजूर केल्याबद्दल खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांचा यावेळी प्रवाशांनी सत्कार केला व आभार मानले. कार्यक्रमाचे संचलन सचिन स्वामी, अॅड. अरूण पाठक यांनी केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बॅकेचे अध्यक्ष अशोक जैन, विभाग नियंत्रक जालिंदर सिरसाट, आगार प्रमुख रणजित राजपूत, वैद्यनाथ बॅकेचे उपाध्यक्ष विनोद सामत, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, जीवराज ढाकणे, बंकटराव कांदे, दिनकरराव मुंडे, रमेश कराड, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन प्रकाश सामत, सुधाकर पौळ, नगरसेविका उमाताई समशेट्टे,प्रा. पवन मुंडे, सचिन कागदे, दत्ता कुलकर्णी, उमेश खाडे, शेख अब्दुल करीम, वैजनाथ जगतकर, योगेश मेनकुदळे, अंजली माळी, सुशीला फड आदींसह नागरिक व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Body:बConclusion:ब
Last Updated : Sep 20, 2019, 11:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.