बीड - केंद्र सरकारच्या लोकविरोधी आणि कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून, देशभरातील कामगार संघटनांनी आज (बुधवार) बंद पुकारला आहे. यामध्ये शासकीय कर्मचारी यांच्यासह शेतकरीही रस्त्यावर उतरले आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच भारत बंद आंदोलनाला आक्रमक स्वरूप मिळल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले.
हेही वाचा - आज भारत बंद! 25 कोटी कामगार जाणार संपावर..
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात आंबा साखर कारखान्याजवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अंबाजोगाई लातूर मार्गावर टायर जाळून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. सरकारच्या कारभारामुळे शेतकरी पूर्णतः संकटात सापडला आहे. याकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याचबरोबर पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी देखील केली.