बीड - वडवणीत पीक विमा मिळवण्यासाठी ( Agitation in Vadwani to take crop insurance ) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भिक मागो आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात सत्तेबरोबर ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने ( Loss of farmers due to return rains ) हाहाकार माजवला होता. हाता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा परतीच्या पावसाने हिरावून घेतला जिल्ह्यात लाखो हेक्टर वरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
भिक मागो आंदोलन - बीड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. हा भरलेला पिक विमा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळावा याच्यासाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आली, मोर्चे काढण्यात आले. मात्र, सरकारने याची काही दखल घेतली नाही. त्यामुळे आज वडवणी शहरात काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भिक मागो आंदोलन केला आहे.
प्रमुख मागण्या -
१ ) वडवणी तालुक्यातील उर्वरीत शेतकऱ्यांचा पिक विमा देण्यात यावा .
२ ) पिक विम्यासाठी जाचक अटी रद्द करण्यात याव्यात.
जिल्ह्यातील 21 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी - बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे नुकसान होऊनही नव्या शासकीय नियमानुसार मदत मिळालेली नाही. पीकविमा तक्रारी करूनही कंपनी सर्व्हे केला नाही. बीड जिल्ह्यातील 21 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या तक्रारी नाकारल्या आहेत. लाखो तक्रारी पेंडिंग असून सावळा गोंधळ पीकविमा कंपनीने सुरु केला आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची निवेदने देऊन हि शेतकऱ्यांची प्रश्ने निकाली लागली नाहीत. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज निवेदन पाठविले आहे.
सरकार झोपेत - शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा भरला होता, परंतु या पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर केला नाही. अनेक वेळा जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी धरले मोर्चे काढले आंदोलन केले, मात्र या सरकारला पीक विमा कंपनीला जाग आली नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ तर पिकावर लाल्या रोगासारखे अनेक रोग येतात. शेतकऱ्यांचा पिक विमा मंजूर केला नाही, त्यामुळे आम्ही वडवणी तालुक्याच्या वतीने भिक मांगो आंदोलन करून हा जमा झालेला निधी आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत, असे युवराज शिंदे या आंदोलकाने सांगितले.