ETV Bharat / state

बीड जिल्हा परिषद: सभापती निवडीमध्ये महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व - बीड जिल्हा परिषद सभापती न्यूज

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या सभापतीपदाच्या निवडी शुक्रवारी झाल्या. समाज कल्याण सभापती म्हणून कल्याण अबुज तर महिला बाल-कल्याण सभापती म्हणून यशोदा बाबुराव जाधव यांची निवड झाली. जयसिंह सोळंके आणि सविता मस्के यांची विषय समितीच्या सभापती पदी निवड झाली.

महाविकास आघाडीचे नेते
महाविकास आघाडीचे नेते
author img

By

Published : Jan 24, 2020, 4:55 PM IST

बीड - जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या सभापती पदांच्या निवडी शुक्रवारी झाल्या. महाविकास आघाडीतील जयसिंह सोळंके, सविता मस्के, कल्याण अबुज आणि यशोदा जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सभापतीपदांच्या निवड प्रक्रियेमधून भाजपला माघार घेण्याची नामुष्की ओढावली.

बीडमध्ये महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

समाज कल्याण सभापती म्हणून कल्याण अबुज तर महिला बाल-कल्याण सभापती म्हणून यशोदा बाबुराव जाधव यांची निवड झाली. जयसिंह सोळंके आणि सविता मस्के यांची विषय समितीच्या सभापती पदी निवड झाली.

हेही वाचा - शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटवली, राष्ट्रवादी आक्रमक

बीड जिल्हा परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खलबते झाली. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या गटातील यशोदा जाधव यांची सभापतीपदी निवड करून युधाजित पंडित यांना डावलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या खेळी मुळेच पंडित यांना बाजूला केल्याची चर्चा आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धक्का दिला. त्यानंतर विषय समिती सभापतीच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीतच मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होती. अनेकजण दावेदार असल्याने सभापती निवडीचे मोठे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर होते. महाविकास आघाडीतील हा अंतर्गत वाद भाजपला आपल्या पथ्यावर पडेल असे वाटत होते मात्र, तसे घडले नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः उपस्थित राहून या निवड प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला होता.

Intro:बीड जिल्हा परिषद; सभापती निवडीमध्ये महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व; भाजपची माघार

बीड- येथील जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी शुक्रवारी झाल्या यामध्ये महा विकास आघाडीचे सदस्य बिनविरोध निवडले गेले सभापती निवड प्रक्रिया मधून भाजपला माघार घेण्याची नामुष्की ओढावली. यामध्ये महाविकास आघाडीतील जयसिंह सोळंके, सविता मस्के, कल्याण अबुज आणी यशोदा जाधव यांच्या बिनविरोध सभापती निवडी झाल्या.

Body:बीड जिल्हा परिषद बीड जिल्हा परिषद विषय समितीच्या निवडीमध्ये समाज कल्याण सभापती म्हणून कल्याण अबुज तर महिला बालकल्याण सभापती म्हणून यशोदा बाबुराव जाधव यांची निवड झाली आहे. याशिवाय जयसिंह सोळंके आणि सविता मस्के यांची विषय समितीचा सभापती पदी निवड झाली आहे.

एकंदरीत बीड जिल्हा परिषदेच्या सभापतिपदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सभापती निवडीवरून खलबते झाली. यामध्ये शिवसेनेचे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या गटातील म्हणजे शिवसेनेतील यशोदास जाधव यांना सभापतीपदी निवड करून युधाजित पंडित यांना डावलले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या खेळी मुळेच गेवराई मध्ये बदामराव पंडित यांना बाजूला करत यशोदा जाधव यांना सभापती असल्याचे पाहायला मिळत आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष च्या निवडणुकीत विकास आघाडीने भाजपला धक्का दिल्यानंतर विषय समिती सभापती च्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होती अनेकजण दावेदार असल्याने सभापती निवडीचे मोठे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर होते तर भाजपला महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद आपल्या पथ्यावर पडेल असे वाटत होते. मात्र तसे घडले नाही. शुक्रवारी झालेल्या सभापती निवडीमध्ये महाविकास आघाडीने आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे तर भाजपने मधून माघार घेतली आहे.

Conclusion:बीड येथे शुक्रवारी स्वतः धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून या निवड प्रक्रियेमध्ये हे सहभाग नोंदवला होता.

---------

सोबत बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची बाईट व विजनल अपलोड करत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.