ETV Bharat / state

Transgender Wedding In Beed : अनोखा विवाह, तृतीयपंथी सपना आणि बाळू अडकले विवाहबंधनात

तृतीयपंथी सपना आणि बाळू यांचा विवाह सोहळा आज (सोमवार) पार ( Beed Transgender Sapna Balu Got Married ) पडला. बीड मधील कंकालेश्‍वर मंदिरात दोघे विवाहबंधनात ( Transgender Wedding In Beed ) अडकले. या अनोख्या विवाह सोहळ्याला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होती.

Transgender Wedding In Beed
Transgender Wedding In Beed
author img

By

Published : Mar 7, 2022, 7:03 PM IST

बीड - मागील काही दिवसांपासून तृतीयपंथी सपना आणि बाळू यांच्या विवाहाची राज्यभरात चर्चा होती. आज (सोमवार) बीड शहरातील कंकालेश्‍वर मंदिरात दोघांचा विवाह सोहळा संपन्न ( Beed Transgender Sapna Balu Got Married ) झाला. समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी कन्यादान केलं ( Transgender Wedding In Beed ) आहे. या विवाह सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

तृतीयपंथी सपना आणि बाळू हे गेल्या दोन वर्षापासून एकमेकांना ओळखत होते. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेम झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचे लग्न लावून देण्यासाठी शहरातील काही समाजसेवक, पत्रकारांनी पुढाकार घेतला. आणि आज महिला दिनाच्या पूर्वसंधेला दोघे विवाहबंधनात अडकले आहे. कंकालेश्‍वर मंदिरात तृतीयपंथी सपना आणि बाळूचा विवाह पार पडला. हा लग्न सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती.

या जोडप्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी तृतीयपंथीयांच्या शिवलक्ष्मी संजय झालटे या आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. तर, समाजकल्याण अधिकारी सचिन मडावी यांनी कन्यादान केलं आहे. या आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याची बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात चर्चा होत आहे.

हेही वाचा - Former Mla Bhai Jagtap : एक टायपिंग मिस्टेक अन् विधानपरिषदेत पुन्हा भाई जगतापांच्या नावाची चर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.