ETV Bharat / state

Gujarat black market : गुजरातच्या काळ्या बाजारात जाणारा रेशन तांदळाचा ट्रक पोलिसांनी केला जप्त - Going to black market of Gujarat

गुजरातच्या काळ्या बाजारात ( Gujarat black market ) जाणारा रेशन तांदळाचा ट्रक पोलिसांनी पकडला. आयपीएस धीरजकुमार यांच्या कार्यवाहीत ४५ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त. तालखेड फाट्याजवळ कार्यवाही केली.

Police caught rice Going to black market
काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पोलिसांनी पकडला
author img

By

Published : Nov 9, 2022, 1:30 PM IST

बीड : गुजरातच्या काळ्या बाजारात ( Gujarat black market ) जाणारा रेशन तांदळाचा ट्रक पोलिसांनी ( Rice caught by police ) पकडला. आयपीएस धीरजकुमार यांच्या कार्यवाहीत ४५ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त. तालखेड फाट्याजवळ कार्यवाही केली.

तालखेड फाटा येथे करण्यात कार्यवाही : गुजरातच्या काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा शासकीय रेशन तांदळाचा ट्रक पोलिसांनी पकडला. ही कार्यवाही आयपीएस बी.धीरजकुमार यांनी तालखेड फाटा येथे करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ३८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. लेलँड कंपनीच्या १४ टायर ट्रक क्रमांक एम.एच. २१, बीजी २२१८ या ट्रक मधून राशनचा तांदूळ तालखेड फाट्यावरून जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली.

आरोपींनी दिली कबुली : यावरून आयपीएस बी.धीरजकुमार यांनी वरील क्रमांकाचा ट्रक तालखेड फाट्याजवळ अडवला. यावेळी पोलिसांनी ट्रकमध्ये असणाऱ्या तांदळाच्या बोऱ्या तपासल्या. यात राशनचा तांदूळ दिसून आला. तांदूळ बोऱ्यांची मोजणी केली असता २९३८० किलो तांदूळ भरला. २५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे ज्याची किंमत ७ लाख ३४ हजार पाचशे रुपये होते. तर पकडलेल्या जुन्या लीलँड कंपनीच्या ट्रकची किंमत ३८ लाख रुपये आहे . दरम्यान सदरील ट्रक हैदराबाद वरून भरून गुजरातच्या काळ्या बाजारात जात असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. अतिशकुमार देशमुख यांच्या फिर्यादीवरून आरोपी जयश मुकुंद पगारे, विकास संजय हिवराळे राहणार इब्राहिमपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याविरोध माजलगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.