ETV Bharat / state

बीड पोलिसांचा प्रताप, मृत व्यक्तीवरच केला गुन्हा दाखल - died

बीड शहरातील जालना रोडवरील होंडा शोरूमचे मालक रामरतन कासट आणि सचिन जवाहर कांकरिया, अशी दोन वाळू साठा प्रकरणातील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यामध्ये रामरतन कासट हे हयात नसल्याची माहिती आहे.

बीड पोलिसांचा प्रताप
author img

By

Published : Jun 29, 2019, 12:47 PM IST

बीड - वाळू वाहतूकदारांनी हप्तेखोर अधिकाऱ्यांची नावे जाहीर करून जिल्हा प्रशासनाची इज्जत चव्हाट्यावर आणली आहे. यानंतर वाळू साठ्यांवर कारवाई करत असल्याचे दाखवण्याच्या नादात बीड पोलिसांनी चक्क मृत झालेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या कारवाईवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बीड पोलिसांचा प्रताप

बीड शहरातील जालना रोडवरील होंडा शोरूमचे मालक रामरतन कासट आणि सचिन जवाहर कांकरिया अशी दोन वाळू साठा प्रकरणातील पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यामध्ये रामरतन कासट हे हयात नसल्याची माहिती आहे. मागील पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यातील वाळू प्रकरण गाजत आहे. एकीकडे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा म्हणून थेट हाऊसमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला जात असूनही कारवाईला विलंब होत आहे. तर दुसरीकडे मात्र बीड पोलीस मृत व्यक्तीवरच वाळू प्रकरणात गुन्हे दाखल करत आहेत.

सुमारे ३० ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. ज्या जागेवर वाळू साठा होता ती जागा राजेंद्र कासट, सुरेंद्र कासट, रवींद्र कासट आणि जितेंद्र कासट यांच्या नावे असल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे. अशात या व्यक्तींच्या नावे गुन्हा दाखल करण्याऐवजी शिवाजीनगर पोलिसांनी मयात असलेले रतनलाल कासट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एपीआय शिवलाल पुरभे यांनी सांगितले की, पंचनामा करताना चुकीची नावे दिली असल्याने या प्रकरणात मयत व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. मयताचे नाव तात्काळ वगळले जाईल, असेही ते 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

Intro:आश्चर्य...वाळू प्रकरणात बीड पोलिसांनी हयात नसलेल्या व्यक्तीवरच केला गुन्हा दाखल

बीड- वाळू वाहतूकदारांनी हप्तेखोर अधिकाऱ्यांची नावे हे जाहीर करून जिल्हा प्रशासनाची इज्जत चव्हाट्यावर आणल्यानंतर वाळू साठ्यांवर कारवाई करत असल्याचे दाखवण्याच्या नादात बीड पोलिसांनी चक्क मयत झालेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल करून त्याला आरोपी बनवले आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Body:याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड शहरातील जालना रोडवरील होंडा शोरूम चे मालक रामरतन कासट व सचिन जवाहर कांकरिया असे दोन वाळू साठा प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. यामध्ये रामरतन कासट हे हयात नसल्याची माहिती आहे. बीड शिवाजीनगर पोलिसांनी वाळू प्रकरणात मयत व्यक्तीवरच गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यातील वाळू प्रकरण गाजत आहे. एकीकडे अवैध वाळू वाहतूक ककरणाऱ्यांवर कारवाई करा म्हणुन थेट हाऊस मध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला जात आहे केला जाऊनही कारवाईला विलंब होत आहे तर दुसरीकडे मात्र बीड पोलीस मयत व्यक्तीवरच वाळू प्रकरणात गुन्हे दाखल करत आहेत

Conclusion:अंदाज 30 ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली आहे ज्या जागेवर वाळू साठा होता ती जागा राजेंद्र कासट, सुरेंद्र कासट, रवींद्र कासट व जितेंद्र कासट यांच्या नावे असल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू साठा सापडला असला तरी हयात असलेल्या व्यक्तींच्या नावे गुन्हा दाखल करण्याऐवजी शिवाजीनगर पोलिसांनी मयात असलेले रतनलाल कासट यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एपीआय शिवलाल पुरभे यांनी सांगितले की, पंचनामा करताना चुकीची नावे दिली असल्याने या प्रकरणात मयत व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. मयताचे नाव तात्काळ वगळले जाईल असेही ते यावेळी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.