ETV Bharat / state

शरद पवारांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्या; बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

शरद पवार यांच्यावरील गुन्हा ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांना निवेदनदेखील देण्यात आल्याचेही माजी आमदार उषा दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.

माजी आमदार उषा दराडे
author img

By

Published : Sep 26, 2019, 9:57 PM IST

बीड - "शरद पवार शिखर बँकेचे संचालक नसतानाही ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भाजप सरकार खोटे बोलत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र भाजपने रचले आहे", असा घणाघाती आरोप माजी आमदार उषा दराडे यांनी केला. शरद पवार यांच्यावरील गुन्हा ताबडतोब मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांना निवेदनदेखील देण्यात आल्याचेही दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले.

माजी आमदार उषा दराडे

हेही वाचा - ...तर शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात जावे - किरीट सोमैया

माजी आमदार राजेंद्र जगताप, सुनील धांडे, सय्यद सलीम हेदेखील यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना उषा दराडे म्हणाल्या की, जातीयवादी पक्षाला शह देण्याची क्षमता शरद पवार यांच्यामध्ये आहे. म्हणून, जाणीवपूर्वक त्यांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा घाणेरडा प्रयत्न मुख्यमंत्री आणि भाजप करत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड केले. तरीदेखील एकाही मंत्र्यांवर कारवाई झाली नाही. मात्र, शिखर बँकेवर संचालक सुद्धा नसलेल्या शरद पवारांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Intro:शरद पवार यांच्या वरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; बीड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

बीड- ज्या शिखर बँकेचे शरद पवार संचालक देखील नव्हते, असे असताना त्यांच्यावर ईडी ने गुन्हा दाखल केला आहे. भाजप सरकार खोटे बोलत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र भाजपने केले आहे. ताबडतोब शरद पवार यांच्यावरील गुन्हा मागे घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा पदाधिकारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. यावेळी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांना निवेदन देण्यात आले असल्याचे माजी आमदार उषा दराडे व राष्ट्रवादी कॉग्रेस चे बीड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जगताप, सुनील धांडे, सय्यद सलीम यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत बोलताना उषा दराडे म्हणाल्या की, जातीयवादी पक्षाला शह देण्याची क्षमता शरद पवार यांच्यामध्ये असल्यानेच त्यांना जाणीवपूर्वक गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा घाणेरडा प्रयत्न मुख्यमंत्री व भाजप करत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या 16 मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड केले. तरी देखील एकाही मंत्र्यांवर कारवाई केली नाही. मात्र शिखर बँकेवर संचालक सुद्धां नसलेल्या शरद पवारांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्याचे पाप भारतीय जनता पक्षाने केले आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी आ. उषा दराडे यांनी केला. पत्रकार परिषदेनंतर जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांना निवेदन देऊन शरद पवार वरील गुन्हा मागे घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.