ETV Bharat / state

लोखंडी सावरगाव परिसर संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित; जिल्हा प्रशासनाचा निर्णय - बीडमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार

लोखंडी सावरगाव परिसरात काही कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर लोखंडी सावरगाव परिसर संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून बीड जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना देखील पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

बीड
बीड
author img

By

Published : Jan 17, 2021, 6:19 PM IST

बीड - जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील लोखंडी-सावरगाव परिसरात काही कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर लोखंडी सावरगाव परिसर संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून बीड जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना देखील पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

बीडमधील अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी-सावरगांव येथे बर्ड फ्लू रोगाने काही कोंबड्यांचा मृत्यू झाले आहेत. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गगस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, संबंधित गावांच्या 1 ते 10 कि. मी. परिसरातील गावांना पुढील आदेशापर्यंत सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले असून, या गावांतील कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध घालण्यास आलेला आहे. पुढील आदेशापर्यंत लोखंडी सावरगाव परिसराला संसर्गग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये -

यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये कोंबड्यांच्या मृत्यूबाबत भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, आपल्या भागात एक किंवा दोन कावळे मृत पावल्यास घाबरून जावू नये, परिसरात मृत कावळे /कोंबड्या आढळून आल्यास ग्रामपंचायत, नगरपंचायत यांच्याशी अथवा नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा. मृत कावळ्यांना उघड्या हाताने स्पर्श करू नये, मास्क वापरावा. तसेच सदरील भाग धुण्याच्या सोड्याने किंवा चुण्याने निर्जंतुकीकरण करून घ्यावा, असे आवाहन बीड जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.