बीड - देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकसंघ देशाला भाजप सरकार तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप 'जमीयत-ए-उलेमा हिंद'ने केला आहे. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला होता. केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्याच्या विरोधात मुस्लीम समाजाने ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहेत. हा कायदा मुस्लीमांच्या विरोधात असल्याचे आंदोलक अॅड. शेख शफिक यांनी मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा - 'नागरिकत्व सुधारणा कायद्या'चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत आता बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील ६ धार्मिक अल्पसंख्याक (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात येणार आहे. त्यामुळे आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे. 'भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करून देशातील मुस्लीम बांधवांवर भाजप अन्याय करत आहे. या विधेयकाच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून देशभरात आंदोलन करत आहोत. शासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन हे विधेयक नामंजूर करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
हेही वाचा - 'कॅब' : आसाम, दिल्ली अन् पश्चिम बंगालमधील आंदोलन तीव्र; ईशान्य सीमेवरील १०६ रेल्वेगाड्या रद्द