ETV Bharat / state

दुष्काळाची दाहकता: 741 टँकर 590 चारा छावण्यांवर बीड जिल्ह्याची मदार - drinking water

बीड जिल्ह्यात 590 चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने एकूण 921 चारा छावण्यांना मंजुरी दिली होती. यामध्ये 268 चारा छावण्या चालकांनी मंजुरी घेतली मात्र छावण्या सुरूच केल्या नाहीत.

दुष्काळाची दाहकता
author img

By

Published : Apr 22, 2019, 7:10 PM IST

बीड- जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे पाणी व चारा टंचाईने संपूर्ण बीड जिल्हा होरपळत आहे. आज घडीला 741 टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. तर 590 चारा छावण्यांमधून जनावरांना चारा दिला जात आहे. बीड जिल्ह्यात एकूण 1400 गावांची संख्या आहे. जिल्ह्यात साडेसात लाख जनावरांची संख्या आहे.

बीड पाणी प्रश्न गंभीर बनलाय

माणसांच्या पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा पुरविण्याचे मोठे आवाहन बीड जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. अजून किमान अडीच महिने तरी पाणी व चारा टंचाईचा सामना बीडकरांना करावा लागणार आहे. एवढेच नाही तर बीड जिल्ह्यातील पाणी पातळी साडेसात मीटर पेक्षा अधिक खालावली असल्याचे भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात सातत्याने पडणारा दुष्काळ व पाणीटंचाई हे आता बीड जिल्ह्यासाठी नवीन नाही. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 590 चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने एकूण 921 चारा छावण्यांना मंजुरी दिली होती. यामध्ये 268 चारा छावण्या चालकांनी मंजुरी घेतली मात्र छावण्या सुरूच केल्या नाहीत. आज घडीला बीड जिल्ह्यातील 590 छावण्यांमधून 4 लाख 26 हजार 2 एवढ्या जनावरांना शासन चारा व पाणी देत आहे. शासनाने एक महिन्यापूर्वी अधिग्रहीत केलेल्या उद्भव देखील कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत यामध्ये विहिरी व वर वर मिळून 876 शासनाने अधिग्रहीत केल्या आहेत त्या ठिकाणावरुन टँकर भरून गावांना पाणी पुरविले जात आहे.

बीड जिल्ह्यात लघु व मध्यम प्रकल्प प्रकल्पांची संख्या एकूण 144 एवढी आहे. सर्वाधिक दुष्काळ जाणवणाऱ्या तालुक्यांमध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व गेवराई तालुक्याचा समावेश आहे. आष्टी तालुक्यात 144 गावे आणि 200 वाड्या टंचाई ग्रस्त आहेत. त्याठिकाणी सीना- मेहकरी येथील तलावातून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र सीना व मेहकरी धरणात देखील केवळ चार दिवस पुरेल एवढाच पाणी पुरवठा शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे प्रशासनासमोर पाणीटंचाईचे मोठे आवाहन उभे राहणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई देखील वाढत आहे. साडेतीन हजार रुपये शेकडा ज्वारीचा कडबा शेतकऱ्यांना विकत घ्यावा लागत आहे. याचा परिणाम बीड जिल्ह्यातील दुग्धव्यवसायावर झाला असल्याचे चित्र आहे.

Intro:बीड जिल्ह्यातील दुष्काळाबाबत ची विशेष स्टोरी मोजो वर अपलोड करत आहे.. बरोबर विजवल व वाईट देखील अपलोड करत आहे..

शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष भाई गंगाभिषण थावरे यांचा बाईट बातमीबरोबर अपलोड करत आहे
*************
दुष्काळाची दाहकता: 741 टँकर 590 चारा छावण्यांवर बीड जिल्ह्याची मदार

बीड- जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे पाणी व चारा टंचाई ने संपूर्ण बीड जिल्हा होरपळत आहे. आज घडीला 741 टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. तर 590 चारा छावण्यांमधून जनावरांना चारा दिला जात आहे. बीड जिल्ह्यात एकूण 1400 गावांची संख्या आहे. जिल्ह्यात साडेसात लाख जनावरांची संख्या आहे. माणसांच्या पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा पुरविण्याचे मोठे आवाहन बीड जिल्हा प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. अजून किमान अडीच महिने तरी पाणी व चारा टंचाईचा सामना बीडकरांना करावा लागणार आहे. एवढेच नाही तर बीड जिल्ह्यातील पाणी पातळी साडेसात मीटर पेक्षा अधिक खालावली असल्या चे भूजल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Body:बीड जिल्ह्यात सातत्याने पडणारा दुष्काळ व पाणीटंचाई हे आता बीड जिल्ह्यासाठी नवीन नाही. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 590 चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने एकूण 921 चारा छावण्यांना मंजुरी दिली होती. यामध्ये 268 चारा छावण्या चालकांनी मंजुरी घेतली मात्र छावण्या सुरूच केल्या नाहीत. आज घडीला बीड जिल्ह्यातील 590 छावण्यांमधून 4 लाख 26 हजार 2 एवढ्या जनावरांना शासन चारा व पाणी देत आहे. शासनाने एक महिन्यापूर्वी अधिग्रहीत केलेल्या उद्भव देखील कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केल्या आहेत यामध्ये विहिरी व वर वर मिळून 876 शासनाने अधिग्रहीत केल्या आहेत त्या ठिकाणावरुन टँकर भरून गावांना पाणी पुरविले जात आहे.

Conclusion:बीड जिल्ह्यात लघु व मध्यम प्रकल्प प्रकल्पांची संख्या एकूण 144 एवढी आहे. सर्वाधिक दुष्काळ जाणवणाऱ्या तालुक्यांमध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर कासार व गेवराई तालुक्याचा समावेश आहे. आष्टी तालुक्यात 144 गावे आणि 200 वाड्या टंचाई ग्रस्त आहेत. त्याठिकाणी सीना- मेहकरी येथील तलावातून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र सीना व मेहकरी धरणात देखील केवळ चार दिवस पुरेल एवढाच पाणी पुरवठा शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल. यामुळे प्रशासनासमोर पाणीटंचाईचे मोठे आवाहन उभे राहणार आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याची टंचाई देखील वाढत आहे. साडेतीन हजार रुपये शेकडा ज्वारीचा कडबा शेतकऱ्यांना विकत घ्यावा लागत आहे. याचा परिणाम बीड जिल्ह्यातील दुग्धव्यवसायावर झाला असल्याचे चित्र आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.