ETV Bharat / state

बीडमध्ये २० लाखांपेक्षा जास्त मतदार बजावणार मतदानाचा हक्क, २ हजार केंद्रांवर मतदान

जिल्ह्यातील १ हजार ४०३ गावांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम दाखवून मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी
author img

By

Published : Mar 12, 2019, 4:20 PM IST

बीड - १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकीत जिल्हाभरातून २० लाख २८ हजार ३३९ मतदार मतदान करणार आहेत. हे मतदान २ हजार ३११ मतदान केंद्रांवरून होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी व्हीडिओ

देशभरात रविवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यावर्षी एम-३ व्हर्जन ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच, व्हीव्हीपॅट मशीन देखील वापरण्यात येणार आहेत. बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली.

पांडे म्हणाले, की बीड जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदारसंघात प्रशासनाने योग्य ती निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त असेल. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणुकांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यासाठी मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ हजार ४०३ गावांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम दाखवून मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

बीड लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना काही तक्रार करायची असेल, तर निवडणूक आयोगाच्या अॅपवर तक्रार नोंदवावी. त्यावर काही वेळातच कारवाई करण्यात येईल. १९५० हा टोल फ्री क्रमांक मतदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मतदार यादीतील आपल्या माहितीची खातरजमा करून घेता येईल. तसेच मतदार यादीबाबत काही तक्रार असेल तरी तीही देता येईल.

Intro:बीड लोकसभा: 2311 मतदान केंद्रावरून वीस लाख 28 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

बीड : जिल्ह्यात एकूण 2 हजार 311 मतदान केंद्रावर 20 लाख 28 हजार 339 मतदार बीड लोकसभा मतदार संघात मतदान करणार आहेत. शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन बीड जिल्हाधिकारी कुमार पांडे यांनी केले. रविवार पासून आचारसंहिता लागू झाली असून यावर्षी m-3 वर्जन ईव्हीएम मशीन या निवडणुकीमध्ये वापरण्यात येणार आहेत. evm मशीन सोबत vvpat हे मशीन पहिल्यांदाच वापरण्यात येणार असल्याचेही ही जिल्हाधिकारी पांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

Body:बीड लोकसभा मतदारसंघात निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले की, बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रशासनाने योग्य ती निवडणुकीची तयारी केलेली आहे. निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावे यासाठी पोलिस बंदोबस्त असेल या शिवाय निवडणुकांमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे यासाठी मतदारजनजागृती कार्यक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येणार आहे जिल्ह्यातील चौदाशे तीन गावांमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम दाखवून मतदानाचा टक्का वाढवण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे

Conclusion:बीड लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वसामान्य नागरिकांना काही तक्रार करायची असेल तर निवडणूक आयोगाचे असेल त्या अॅप वर फोटो काढून टाकल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जाईल. याशिवाय यावर्षी मतदारांसाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक मतदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मतदार यादीतील आपल्या माहिती बाबत माहिती करून घेऊ शकतात. तसेच मतदार यादी बाबत काही तक्रार असेल त्याबाबत वरील क्रमांकावर माहिती देता येऊ शकते. येणाऱ्या होत असलेल्या लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी पांडे यांनी केले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.