बीड- बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दिनांक 4 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता नवीन नियमांनुसार अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली आहे.
नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे
जिल्ह्यातील लॉकडाऊमध्ये उद्यापासून सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत शिथिलता देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे असे ट्विट मुंडे यांनी केले आहे. दरम्यान त्यापूर्वी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात यावी. अशी मागणी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी केली होती.
हेही वाचा - चोपडा येथे पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नसल्याचे अधीक्षकांचे स्पष्टीकरण