बीड - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. संक्रमणाची ही साखळी रोखण्यासाठी बीड शहरात आठ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 12 वाजता आठ दिवसांच्या लॉकडाऊनला सुरुवात झाली असून 9 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बुधवारी रात्री हा निर्णय घेतला.
बुधवारी शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. यातील एका रुग्णाने बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले आहे. सदर रुग्णाचा अनेकांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्क आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री उशीरा पुन्हा आठ दिवसासाठी बीड शहर बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान सध्या जिल्ह्यात 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
सदर रुग्णाने उपचार घेतलेल्या खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णाचा शोध घेण्यात येत आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी बीड प्रशासन संपूर्ण खबरदारी घेत आहे. अनलॉक-2 मध्ये कोरोनाची परिस्थिती लक्षात घेवून निर्णय घेण्याचे सर्वाधिकार राज्यशासनाने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. त्यानूसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.