बीड Beed Army Jawan Death: कर्तव्यावर असलेले जवान पांडुरंग वामन तावरे या पुरामध्ये वाहून गेले. यामध्ये ढगफुटीत बीड जिल्ह्याचे भूमीपुत्र जवान पांडुरंग वामन तावरे हे 3 दिवसांपासून बेपत्ता झाले होते. पुराच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी त्यांचे मूळ गाव पाटोदा तालुक्यातील काकडहिरा या गावी आणणार आहेत व त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तिस्ता नदीला मोठा पूर: सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 ते 2.00 वाजण्याच्या सुमारास ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला मोठा पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली. यानंतर नदीलगतचा भाग पाण्याखाली आला. नदीलगतच्या परिसरात लष्कराची छावणी होती. ती पुरामध्ये वाहून गेली आणि तेथे उभी असलेली सैन्य दलाची वाहने बुडाली. या जवानांमध्ये बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जवान पांडुरंग वामन तावरे (वय 36) हे बेपत्ता झाले होते आज त्यांचा मृतदेह आढळून आला.
आतापर्यंत देशाच्या अनेक भागात सेवा: पांडुरंग वामन तावरे हे 2009 मध्ये लष्करात भरती झालेले होते. मागील 14 वर्षांपासून ते महार बटालियन (18) मध्ये नायक या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी देशातील दिल्ली, राजस्थान, आसाम, बिकानेर, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब विविध ठिकाणी देशाची सेवा केली. मागील 2 महिन्यांपूर्वी सिक्कीम मधील गंगटोक येथे कर्तव्यासाठी गेले होते. त्याठिकाणी मंगळवारी रात्री ते बंगाल बॅंकडुगी युनिटकडं निघाले होते.
काय घडले त्या रात्री: पांडुरंग वामन तावरे हे स्वतः एका वाहनाचे चालक होते. दरम्यान त्यांनी मंगळवारी रात्री 9.30 वाजता त्यांच्या पत्नी गोदावरी यांना मोबाईल वर संपर्क साधला आणि चर्चा केली. बुधवारी 1.30 ते 2.00 च्या सुमारास सिक्कीम येथील ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आला. त्यात जवान वाहून गेल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. दोन दिवसांपासून जवानांचे प्रमुख सुभेदार मेजर यांच्या समवेत संपर्क होत आहे. परंतु, ज्याठिकाणी लष्कर छावणी होती, त्या ठिकाणी संपर्क होत नसल्याच्या सूचना बंगाल बॅंकडुगी युनिट येथून मिळाली असल्याचं जवान पांडुरंग तावरे यांच्या पत्नी गोदावरी तावरे यांनी सांगितलयं.
हेही वाचा: