ETV Bharat / state

जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या छावणी तपासणी पथकाने मागितली लाच; गुन्हा दाखल - beed news,

छावणीवरील जनावरे तपासण्यासाठी गेलेल्या एका पथकाने छावणी तपासणीचा अहवाल सोयीचा देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच छावणी चालकाला मागितली असल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी समोर आला.

गोविंद रमेशराव लोळगे
author img

By

Published : May 25, 2019, 6:15 AM IST

बीड- छावणीवरील जनावरे तपासण्यासाठी गेलेल्या एका पथकाने छावणी तपासणीचा अहवाल सोयीचा देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच छावणी चालकाला मागितली असल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी समोर आला. विशेष म्हणजे बीड जिल्हाधिकारी यांनी हे विशेष तपासणी पथक नेमले होते. मात्र याच पथकाने जिल्ह्यातील छावण्यांचे अहवाल सोयीचे देण्यासाठी लाच घेण्याचा सपाटा सुरू केला होता.

शुक्रवारी सायंकाळी बीड तालुक्यातील शिवनी येथील एका छावणीवर तपासणीनंतर लाच मागितल्यावरून तपासणी पथकातील तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

छावणी तपासणीचा सोयीचा अहवाल देण्यासाठी लाच मागणाऱ्यांमध्ये राज्य कर निरीक्षक मारुती गंगाधर मुखडे, गोविंद रमेशराव लोळगे, भारत साजन मेहर (सर्व बीड कार्यालय) असे लाच मागणाऱ्या जीएसटी कार्यालयातील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. बीड जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत सातशे चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू आहेत. मागील आठवड्यात चारा छावण्यातील सावळागोंधळ समोर आला होता. चारा छावण्यातील गैरप्रकार थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी चारा छावणी तपासणीसाठी विशेष पथक नेमले होते.

या पथकात राज्य कर निरीक्षक वस्तू व सेवा कार्यालय या विभागातील वर्ग २ चे तीन अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. नेमलेल्या पथकाकडून छावणी चालकांना सोयीचा अहवाल देण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये घेतले जातात हा गोरखधंदा आजचा नाही जशा छावण्या सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून तपासणी पथकातील अधिकारी छावणी चालकाकडून चिरीमिरी घेऊन सकारात्मक अहवाल देतात. एवढेच नाही तर जनावरे वाढवून देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी छावणी चालकांना मदत करत असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.

आठ दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बीड जिल्ह्यातील छावण्यांची तपासणी झाली होती यातील काही छावण्यांवर कारवाई देखील झाली. मात्र, छावण्यांमधील काळाबाजार अद्यापही थांबलेला नसल्याचे चित्र पाहायला मिळते. या सर्व प्रकाराकडे बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

Intro:खालील बातमीतील वीजवल व आरोपी गोविंद रामेशराव लोळगे याचा फोटो मेल केला आहे.

****************
जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या छावणी तपासणी पथकाने मागितली छावणी चालकाला लाच; पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बीड- छावणी वरील जनावरे तपासण्यासाठी गेलेल्या एका पथकाने छावणी तपासणीचा अहवाल सोयीचा देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच छावणीचा चालकाला मागितली असल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी समोर आला. विशेष म्हणजे बीड जिल्हाधिकारी यांनी हे विशेष तपासणी पथक नेमले होते. मात्र याच पथकाने जिल्ह्यातील छावण्यांचे अहवाल सोयीचे देण्यासाठी लाच घेण्याचा सपाटा सुरू केला होता. अखेर शुक्रवारी सायंकाळी बीड तालुक्यातील शिवनी येथील एका छावणीवर तपासणीनंतर लाच मागितल्यावरून तपासणी पथकातील तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी दिली.

Body:छावणी तपासणीचा सोयीचा अहवाल देण्यासाठी पैसे लाच मागणाऱ्या मध्ये राज्य कर निरीक्षक मारुती गंगाधर मुखडे, गोविंद रमेशराव लोळगे , भारत साजन मेहर (सर्व बीड कार्यालय) असे लाच मागणाऱ्या जीएसटी कार्यालयातील वर्ग दोन च्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. बीड जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत सातशे चारा छावण्या प्रत्यक्षात सुरू आहेत. मागील आठवड्यात चारा छावण्यातील सावळागोंधळ समोर आला होता. चारा छावण्यातील गैरप्रकार थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी चारा छावणी तपासणीसाठी विशेष पथक नेमले होते. या पथकात राज्य कर निरीक्षक वस्तू व सेवा कार्यालय या विभागातील वर्ग 2 चे तीन अधिकारी अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. नेमलेल्या पथकाकडून छावणी चालकांकडून चालकांना सोयीचा अहवाल देण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये घेतले जातात हा गोरखधंदा आजचा नाही जशा छावण्या सुरू झालेल्या आहेत तेव्हापासून तपासणी पथकातील अधिकारी छावणी चालकाकडून चिरीमिरी घेऊन सकारात्मक अहवाल देतात. एवढेच नाही तर जनावरे वाढवून देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी छावणी चालकांना मदत करत असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.

Conclusion:आठ दिवसांपूर्वीच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून बीड जिल्ह्यातील छावण्यांची तपासणी झाली होती यातील काही छावण्यांवर कारवाई देखील झाली. मात्र छावण्यांमधील काळाबाजार अद्यापही थांबलेला नसल्याचे चित्र पाहायला मिळते. या सर्व प्रकाराकडे बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.