ETV Bharat / state

Beed Accident News: बीडच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवरील दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू

बीडच्या शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवरील दोन शिक्षकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला होता.

author img

By

Published : Jul 3, 2023, 2:04 PM IST

Beed Accident News
बीडच्या शिरूर तालुक्यात दोन शिक्षकांचा अपघात

बीड : आज गुरुपौर्णिमेदिवशीच सोमवारी सकाळी 7.45 वाजेच्या सुमारास नगर रोडवर दुचाकी व चार चाकीचा अपघात झाला. या अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्यामुळे सदरील शिक्षकांचे मृतदेह जळाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत, रोज नवीन बातम्या ऐकायला मिळतात. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ऐन गुरूपौर्णिमेच्या दिवशीच शिक्षकांचा बळी गेला आहे.

दुचाकीला चारचाकीची धडक : सदरील मयत शिक्षकांची नावे अंकुश साहेबराव गव्हाणे आणि शहादेव शिवाजी डोंगर आहे. ते शिरूर तालुक्यातील जेधेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. सोमवारी सकाळी बीड येथून दुचाकीवरून जेधेवाडी येथे जात असताना नगर रोडवरील बीपीएड कॉलेज जवळील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला कार क्र. (एम एच 14/ जेई 5372) ने जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला तर अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याने दोघांचे मृतदेह जळल्याचे वृत्त आहे.

शिक्षकांचा बळी गेला : बीड जिल्ह्यात बहुतांशी शासकिय कर्मचारी हे जिल्ह्याच्या ठिकाणीच वास्तव्यास आहेत, मात्र कर्तव्यावर हे ग्रामीण भागात असल्याने ते दररोज ये-जा करावी लागते. अनेक शिक्षक असतील किंवा शासकीय नोकरदार असतील हे जिल्ह्याच्या ठिकाणीच वास्तव्यास असल्याने त्यांना दररोज ये-जा करावी लागते, त्यामुळे असे अपघात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. आज नाहक या शिक्षकांचा बळी गेला आहे. समृद्धी महामार्गावर शनिवारी खाजगी बसचा अपघात झाला होता. या अपघातात 26 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

हेही वाचा :

  1. Buldhana Bus Accident: सर्वात मोठ्या अपघाताच्या मृतदेहांची चिता जळत असताना शपथविधीचा घाट का-विरोधकांची सरकारवर टीका
  2. KK Express Fire : के.के. एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये आग, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला
  3. Buldhana Bus Accident : अपघातातील 24 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार; आमदार संजय गायकवाड यांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.